Goa To Invite Pope Francis: झेवियर यांच्या अवशेष प्रदर्शनासाठी 'पोप'ना आमंत्रित करावे, PMO ला विनंती करणार - CM सावंत

St Francis Xavier’s exposition in Goa: यावर्षी 21 नोव्हेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
St Francis Xavier’s exposition | Goa Govt to request PM to invite Pope Francis
St Francis Xavier’s exposition | Goa Govt to request PM to invite Pope FrancisDainik Gomantak

St Francis Xavier’s exposition in Goa

गोव्यात होणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियरच्या पवित्र अवशेषांच्या दहावार्षिक प्रदर्शनासाठी पोप फ्रान्सिस यांना आमंत्रित करावे, अशी विनंती राज्य सरकार पंतप्रधान कार्यालयाला (PMO) करेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सांगितले.

दर 10 वर्षांनी सर्वांसाठी खुले होणारे सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांचे प्रदर्शन यावर्षी 21 नोव्हेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

ओल्ड गोव्यात ४५ दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाच्या तयारी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. पोप यांनी प्रदर्शनाला भेट द्यावी अशी विनंती करणारे पत्र पंतप्रधान कार्यालयाला दिले जाईल. पंतप्रधान मोदींनी भेट घेतली त्यावेळी देखील पोप यांना भारतात आमंत्रित केले होते, असे सावंत यावेळी म्हणाले.

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सेंट फ्रान्सिस झेवियरच्या अवशेष प्रदर्शन कार्यक्रमासाठी भरघोस अशा 10 कोटी रुपयांची आर्थिक तरदूत करण्यात आली आहे.

St Francis Xavier’s exposition | Goa Govt to request PM to invite Pope Francis
Goa Loksabha Election 2024 Schedule: गोव्यात कधी होणार लोकसभेसाठी मतदान? जाणून घ्या निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक

राज्य सरकार ओल्ड गोवा चर्च संकुलाचे सुशोभीकरण करण्यासह या वारसा स्थळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करेल तसेच, पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

स्पॅनिश जेसुइट मिशनरीचे सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा 7 एप्रिल, 1506 रोजी स्पेनमध्ये जन्म झाला. झेवियर 6 मे, 1542 रोजी गोव्यात पोर्तुगीज वसाहतीमध्ये आले, पुढील दहा वर्षांत त्यांनी मिशनरी कार्य संपूर्ण आशियामध्ये नेले. चीनच्या किनाऱ्यावरील सॅन्सियन बेटावर 3 डिसेंबर 1552 रोजी त्यांचे निधन झाले.

सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष जुन्या गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जीझस येथे दफन करण्यात आले आहेत. दर दहा वर्षांनी हे अवशेष एकदा बाहेर काढले जातात, 1782 मध्ये साली सुरु झालेली ही प्रथा आजपर्यंत सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com