Pooja Naik Case Dainik Gomantak
गोवा

Pooja Naik: 'पूजा'ने ज्‍यांची नावे घेतली होती, त्‍यांच्‍यावर कारवाई का केली नाही? LOP आलेमाव यांचा सवाल; काँग्रेस पक्ष आक्रमक

Cash For Job Goa: कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मुख्‍य आरोपी पूजा नाईक हिने एकामागून एक केलेल्‍या गौप्‍यस्‍फोटांमुळे काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मुख्‍य आरोपी पूजा नाईक हिने एकामागून एक केलेल्‍या गौप्‍यस्‍फोटांमुळे काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे.

या प्रकरणात मंत्र्यासह प्रशासनातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश असल्‍यामुळे प्रकरणाची न्‍यायालयीन चौकशी करा, तसेच ‘त्या’ मंत्र्यांची मुख्‍यमंत्री सावंत यांनी मंत्रिमंडळातून तत्‍काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.

‘‘राज्‍यातील अनेक युवक–युवतींना सरकारी नोकऱ्या मिळवून देण्‍याच्‍या आमिषाने पूजाने त्‍यांच्‍याकडून सुमारे १७ कोटी रुपये उकळले. हे पैसे तिने मंत्री, आयएएस अधिकारी आणि अभियंत्‍याला दिले. गतवर्षी घडलेल्‍या या प्रकरणानंतर पूजाला पोलिसांनी पहिल्‍यांदा अटक केली, त्‍याचवेळी तिने या प्रकरणातील आयएएस अधिकारी आणि अभियंत्‍याचे नाव जबाबात नोंदवले होते.

या प्रकरणास एक वर्ष उलटूनही पोलिसांनी पूजाने ज्‍यांची नावे घेतली होती, त्‍यांच्‍यावर कारवाई का केली नाही? या प्रकरणी सखोल चौकशी करण्‍याची मागणी विरोधकांनी अधिवेशनात केलेली होती. त्‍यावेळी कारवाईची हमी मुख्‍यमंत्र्यांनी सभागृहात दिलेली होती. त्‍यांनी हमी का पाळली नाही?’’ असा सवाल आलेमाव यांनी उपस्‍थित केला.

सरकारच्‍या मान्‍यतेनंतरच ‘एफआयआर’

पूजा नाईक हिने क्राईम ब्रॅंचकडे नव्‍याने दिलेल्‍या जबाबात दोन अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत. त्‍यांच्‍याविरोधात ‘एफआयआर’ दाखल करण्‍याची परवानगी सरकारकडे मागण्‍यात आलेली आहे. पोलिसांनी तसा प्रस्‍ताव सरकारला पाठवलेला आहे.

सरकारच्‍या मान्‍यतेनंतरच त्‍यांच्‍याविरोधात ‘एफआयआर’ दाखल करून त्‍यांची चौकशी सुरू केली जाईल, असे उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्‍ता यांनी मंगळवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले. प्रकरणात सहभागी असलेल्‍या मंत्र्याचे नाव पूजा नाईकने घेतले का? असा प्रश्‍‍न केला असता, पूजाने केवळ दोन अधिकाऱ्यांचीच नावे घेतलेली आहेत. मंत्र्याचे नाव तिने घेतलेले नाही, असेही गुप्ता यांनी स्‍पष्‍ट केले.

क्राईम ब्रँचकडून आणखी तीन तास चौकशी

पूजा नाईकने केलेल्‍या दाव्‍यांबाबत सोमवारी डिचोली पोलिसांनी केलेल्‍या पाच तासांच्या चौकशीनंतर क्राईम ब्रॅंचने मंगळवारीही तिची सुमारे तीन तास चौकशी केली. पूजा नाईकने प्रसारमाध्‍यमांसमोर येऊन तोंड उघडू नये, यासाठी पोलिस कसोशीने प्रयत्‍न करीत असल्‍याचे डिचोलीनंतर मंगळवारी रायबंदर येथील क्राईम ब्रँचच्‍या मुख्‍यालयातही स्‍पष्‍टपणे दिसून आले.

पोलिसांना थोडा वेळ द्या; मुख्‍यमंत्री

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणी पूजा नाईकने केलेल्‍या वक्तव्‍यांची सखोल चौकशी करून नव्‍याने ‘एफआयआर’ नोंदवण्‍याचे आणि तिने ज्‍यांची नावे घेतलेली आहेत, त्‍यांचीही चौकशी करण्‍याचे स्‍पष्‍ट निर्देश आपण पोलिसांना दिलेले आहेत. त्‍यानुसार पोलिसांनी कार्यवाही सुरू केली असून, त्‍यांना थोडा वेळ देणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

सरकारकडून जाणीवपूर्वक केला जातोय काणाडोळा

‘‘राज्‍यातील १८ ते ३५ वयोगटातील ३० ते ४० टक्‍के युवक–युवती बेरोजगार आहेत. अशा सर्वांच्या आयुष्‍याशी पूजा नाईक आणि या प्रकरणात सहभागी असलेल्‍यांनी खेळ केलेला आहे. तरीही बहिरे झालेले सरकार याकडे जाणीवपूर्वक काणाडोळा करीत आहे. त्‍यामुळे या प्रकरणाची न्‍यायालयीन चौकशी होणे गरजेचे आहे’’, अशी मागणीही माणिकराव ठाकरे यांनी केली.

‘‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील आरोपी पूजा नाईक हिने केलेल्‍या दाव्‍यांमध्‍ये सत्‍यता आहे. त्‍यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करून या प्रकरणात सहभागी असलेल्‍या मंत्र्याला मुख्‍यमंत्री सावंत यांनी तत्‍काळ मंत्रिमंडळातून बरखास्‍त केले पाहिजे’’, असे माणिकराव ठाकरे म्‍हणाले. हा गंभीर स्‍वरुपाचा गुन्‍हा आहे. त्‍यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्‍या सर्वांवरच कारवाई झाली पाहिजे’’ असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: क्लब जळून खाक, मालक विदेशात फरार! पळपुड्या मालकांसाठी गोवा पोलिसांकडून 'लुक आऊट' नोटीस जारी; इंटरपोलची घेणार मदत

गोमंतकीय भाविकांसाठी खुशखबर! गोव्याहून शिर्डी-तिरुपतीसाठी सुरु होणार विमानसेवा; खासदार तानावडेंनी केली खास मागणी

Delhi Blast: प्रेमात धोका, एक्स-बॉयफ्रेंडकडून बदला! दिल्ली ब्लास्ट आणि 'डॉक्टरांच्या' कटाच्या पर्दाफाशाचा ओमर अब्दुल्लांनी केला खुलासा

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

10 चौकार, 9 षटकार... 44 चेंडूत ठोकलं शतक! हार्दिक पांड्याचा 'हा' सहकारी खेळाडू रातोरात बनला स्टार; पदार्पण सामन्यात केला वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT