Pooja Naik : "पोलिसांना थोडा वेळ द्या", CM सावंतांकडून 'नवीन FIR'चे आदेश; नोकरी घोटाळा प्रकरणी तपासाची दिशा बदलणार?

CM Pramod Sawant New FIR Order : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी नवीन एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत
Pramod Sawant statement
Pramod Sawant statementDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील बहुचर्चित 'कॅश फॉर जॉब' घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पूजा नाईक हिने केलेले आरोप आणि यापूर्वी तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई न केल्याच्या तिच्या दाव्यानंतर आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी नवीन एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

पूजा नाईकच्या आरोपांची होणार नव्याने चौकशी

पूजा नाईकने नुकताच आरोप केला होता की, ६०० लोकांना सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी तिने एका मंत्री, एका आयएएस अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एका वरिष्ठ अभियंत्याला १७ कोटी रुपये रोख दिले होते. तसेच, तिने यापूर्वीच पोलिसांना ही माहिती दिली होती, पण कोणतीही कारवाई झाली नाही, असा तिचा दावा आहे.

नवीन एफआयआर दाखल करण्याचे निर्देश

"पोलिसांना थोडा वेळ द्या. मी त्यांना नवीन एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत." मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की, नवीन तक्रारीत पूजा नाईकने कोणाचेही नाव घेतल्यास, त्या नावांची सखोल चौकशी केली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल. यामुळे पूर्वीच्या तपासावर आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यशैलीवर नव्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Pramod Sawant statement
Pooja Naik: ‘तो’ मंत्री अजूनही मंत्रिमंडळात! पूजा नाईकच्या दाव्याने खळबळ; प्रकरणाचे गांभीर्य वाढले

PWD मंत्र्यांचे स्पष्टीकरण

हा घोटाळा सार्वजनिक बांधकाम खात्याशी जोडला जात असतानाच, PWD मंत्री दिगंबर कामत यांनी याप्रकरणी आपली बाजू मांडली आहे. मंत्री कामत म्हणाले, "कॅश फॉर जॉब घोटाळ्याच्या तपासाची शक्ती केवळ पोलीस विभागाकडे आहे. पोलीस या तपासाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवतील आणि मुख्यमंत्री त्यावर कारवाई करतील." कॅश फॉर जॉब प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी आणि कारवाईचा अंतिम अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com