Motorcycle Thief Arrested Dainik Gomantak
गोवा

बुलेट चोरून फरार झालेला युवक फोंडा पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी शोधमोहिमेचा वेग वाढवला आणि चोराला आपल्या ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

Motorcycle Thief Arrested: एकीकडे गोव्यातील पोलिस हे कर्तृत्ववान आणि सतर्क पोलिस अधिकारी म्हणून देशभरात नावाजले गेले आहेत; तर दुसरीकडे गोव्यातील गुन्हेगारी विश्वात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. अमली पदार्थांची तस्करी आणि चोरीच्या घटनांचे प्रमाण तुलनेत वाढले आहे. यातच मोटारसायकल चोराला फोंडा पोलिसांनी (Ponda Police) अटक केली आहे.

मूळचा कारवारचा रहिवासी असलेला आणि सध्या मंगेशीमध्ये राहत असलेल्या 24 वर्षीय तरुणाने 'रॉयल एनफील्ड' बुलेट चोरी केली होती. बुलेट मालकाने पोलिसात तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी शोधमोहिमेचा वेग वाढवला आणि चोराला आपल्या ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या चोराचे कोणत्या टोळीसोबत संबंध आहेत का किंवा अजून कोणत्याही प्रकारचा चोरीचा मुद्देमाल याच्याकडे आहे का याचा तपास फोंडा पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electricity Tariff Hike: 1 नोव्हेंबरपासून उद्योगांची वीज महागणार! सौर-ऑफपीक वेळेत 80 पैसे, पीक अवरमध्ये 2 रुपये अतिरिक्त

Narendra Modi Journey: 7 ऑक्टोबर 2001 ते मोदी पर्वाची 25 वर्षे; गुजरातपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास, विकासाच्या दाव्यांपासून रोजगार-लोकशाहीवरील प्रश्नांपर्यंत

DA Hike: सणासुदीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, पगारात झाली घसघशीत वाढ; 'या' सरकारनं दिलं मोठं गिफ्ट

October Heat: 34 अंश तापमान, पण अंगाला जाणवतोय 43 अंशांचा चटका! गोव्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याची तीव्रता वाढली

SIR Voter List Case: 'सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे' म्हणत ECIची स्थगितीची मागणी; गोवा खंडपीठाचा नकार, 'दोन्ही प्रकरणांतील कायदेशीर मुद्दे वेगळे'

SCROLL FOR NEXT