Michael Lobo
Michael LoboDainik Gomantak

पूर्ण बहुमत मिळालं तरीही मगोपला सोबत घेणार : लोबो

भाजपने मगोप आणि गोवा फॉरवर्डला अपमानास्पद वागणूक दिल्याचाही निशाणा
Published on

पणजी : गोवा विधानसभेचा निकाल जसजसा जवळ येत चालला आहे, तसतसा राज्यात राजकीय घडामोडींनाही वेग आल्याचं चित्र आहे. गोव्यात सरकार स्थापन करायचंच असा पवित्रा घेत काँग्रेस नेते दिल्लीतही बैठका घेत आहेत. त्यातच सत्तास्थापनेसाठीचं गणित कसं जुळवायचं याबाबतही काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. यातच मायकल लोबो यांनी मगोपसोबतच्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. (Michael Lobo News Updates)

Michael Lobo
"भाजपचा विजय साजरा करण्यासाठीच काँग्रेस नेते गोव्यात"

काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी 21 जागांची मॅजिक फिगर गाठता आली तरीही मगोपला सोबत घेणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते मायकल लोबो यांनी केली आहे. भाजपने मगोप आणि गोवा फॉरवर्डला अपमानास्पद वागणूक दिली आहे, गोवा फॉरवर्डची आधीच काँग्रेससोबत (Congress) आघाडी आहे. मात्र आता मगोपलाही सन्मानाने सरकारमध्ये स्थान देणार असल्याचं मायकल लोबोंनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांनाही उधाण आलं आहे. काँग्रेसने सरकार स्थापन करण्यासाठी शक्य असेल ते सारंकाही करण्याचा चंगच बांधल्याचं स्पष्ट दिसत आहे. यातच अपक्षांनाही आपल्याकडे खेचण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत.

Michael Lobo
नागरिकांनी जेनेरिक औषधांचा वापर करावा : डॉ. शेखर साळकर

दरम्यान नुकतीच मगोपच्या (MGP) सुदिन ढवळीकरांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. मगोपची तृणमूल काँग्रेससोबत युती आहे. असं असताना भाजपला गरज लागली तर पाठिंबा देणार का असा प्रश्न सुदिन यांना विचारण्यात आला. यावेळी गोव्याचं राजकारण वेगळं असून याचा निर्णय योग्यवेळी घेण्यात येईल असं ढवळीकरांनी स्पष्ट केलं होतं. तसंच तृणमूलसोबत असूनही भाजपशी (BJP) युतीचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले होते. त्यामुळे आता सत्तास्थापनेसाठीचं गणित जुळवण्यासाठी आपला पाठिंबा मगोप कुणाच्या पारड्यात टाकतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com