Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: बनावट ग्राहक पाठवला, सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश; मास्टरमाईंडला बेळगाव येथून अटक

Ponda Crime: फोंड्यातील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक तपास पथक तयार करण्यात आले होते.

Sameer Panditrao

फोंडा: फोंड्यातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा फोंडा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर या रॅकेटमधील फरार मास्टरमाईंड सलीम इब्राहीम कुरेशी (४३) या मूळ बेळगाव येथील संशयिताला पोलिसांनी रात्री अटक केली.

फोंड्यातील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती फोंडा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ३० ऑगस्ट रोजी एक तपास पथक तयार करण्यात आले होते.

या पथकात ‘अर्ज’ या स्वयंसेवी संस्थेला सामील करून घेऊन बनावट ग्राहक या हॉटेलात पाठवण्यात आला आणि तिघा संशयितांना पकडण्यात आले तर पीडित युवतीला महिला सुधारगृहात पाठवण्यात आले.

पोलिसांनी मूळ पश्चिम बंगालमधील; पण सध्या गोव्यात वास्तव्यास असलेल्या नझीम (३३) व जमेदार (३८) या दोघांसह राजेश गौड (४९) या मूळ उत्तर प्रदेशमधील; पण सध्या बिठ्ठोण येथे राहणाऱ्याला फोंडा पोलिसांनी अटक केली होती. सध्या हे तिघेजण न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील चौथा मास्टरमाईंड सलीम कुरेशी हा लपून राहिला होता. फोंडा पोलिसांनी त्याला बेळगाव भागातून शोधून काढून अखेर अटक करण्यात आली आहे.

चौघांचा सहभाग

पश्चिम बंगालमधील नझीम व जमेदार हे एखाद्या पीडित युवतीला शोधून तिला वेश्याव्यवसायात ढकलायचे. अशा युवतीला गोव्यात आणल्यानंतर राजेश गौडा हा ग्राहक आणायचा. सलीम कुरेशी या सर्वांवर ‘लक्ष’ ठेवायचा आणि ग्राहकांकडून पैसे उकळल्यानंतर ते आपसांत वाटून घ्यायचे. मात्र, या रॅकेटवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिस उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "तुम्ही भाजपची B-Team, आम्हीच तुम्हाला नाकारतो", काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत; गोवा निवडणुकीत काँग्रेस 'एकला चलो रे'

Diwali 2025: पणत्या बनवण्याचा वारसा मावळतोय! डिचोलीतील व्यवसाय अंधाराखाली; राज्याबाहेरील पणत्यांची चलती

Goa Police App: गोवा पोलिस आता ‘स्‍मार्ट’ मोबाईलवर! सूचना, सायबर सुरक्षिततेसंबंधी माहिती मिळणार तात्काळ

Panaji: कारमध्ये कोंडले, लाथाबुक्यांनी केली मारहाण; तक्रारदाराची साक्ष देण्यास नकार; खंडणी प्रकरणातील 6 आरोपी निर्दोष

Goa Live News: फर्मागुडी येथील जीव्हीएम सर्कल जवळ कार व स्कुटर यांच्यात अपघात

SCROLL FOR NEXT