Spanish woman molested in Goa hospital
Goa Crime NewsDainik Gomantak

Old Goa Crime: डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना; ICU मधील स्पॅनिश महिलेचा विनयभंग, DNB विद्यार्थ्याला अटक

Goa Crime News: पोलिसांनी याप्रकरणी डॉ. व्ही. दोशी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली आहे.
Published on

जुने गोवे: अतिदक्षता विभागात उपचाराधीन असलेल्या परदेशी महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हेल्थवे रुग्णालयात डीएनबी विद्यार्थ्याने हे कृत्य केले आहे. याप्रकरणी रुग्णालयाने विद्यार्थ्याविरोधात गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे. रुग्णालयाने देखील विद्यार्थ्याला तत्काळ निलंबित केले आहे.

मिळालेल्या मिहितीनुसार, जुने गोवे येथील हेल्थवे रुग्णालयात स्पॅनिश येथील महिला उपचार घेत आहे. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, डीएनबीच्या विद्यार्थ्याने या महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार दाखल केल्यानंतर याबाबत पोलिसांना महिती देण्यात आली.

Spanish woman molested in Goa hospital
CP Radhakrishnan: सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ, धनकड यांनीही लावली हजेरी

पोलिसांनी याप्रकरणी डॉ. व्ही. दोशी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली आहे. रुग्णालयाने देखील त्याला तत्काळ निलंबित केले आहे. दरम्यान, याप्रकरणी हेल्थवे रुग्णालयाने स्पष्टीकरण प्रसिद्ध केले आहे.

"रुग्णाकडून तक्रार आल्यानंतर डॉक्टरविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पीडितेला सर्व प्रकारचे सहकार्य आणि आवश्यक मदत दिली जात आहे. तसेच, तिच्या उपचाराची योग्य काळजी घेतली जात आहे," अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com