Ponda Dainik Gomantak
गोवा

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Ponda fake certificate case: येत्या आठ दिवसात फोंडा पोलिसांकडून आवश्‍यक कृती न झाल्यास पोलिस स्थानकावर मोर्चा नेण्याचा इशारा विलियम आगियार यांनी दिला आहे.

Sameer Panditrao

फोंडा: फोंड्यातील बनावट दाखल्याप्रकरणी संशयित नगरसेवक शिवानंद सावंत याला अटक करण्यात आली असली तरी त्याला लगेच जामीन मिळाल्यामुळे फोंडा काँग्रेस पक्षाने याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

फोंडा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक विलियम आगियार यांनी पत्रकारांशी बोलताना ही मागणी केली. संशयित शिवानंद सावंत हा सत्ताधारी भाजप पक्षाशी संबंधित असल्याने त्याला पोलिसांकडून सूट देण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

येत्या आठ दिवसात फोंडा पोलिसांकडून आवश्‍यक कृती न झाल्यास पोलिस स्थानकावर मोर्चा नेण्याचा इशारा विलियम आगियार यांनी दिला आहे.

नगरसेवक सावंत याला दुसऱ्यांदा फोंडा पोलिसांनी अटक केली. मागच्या वेळेला बोगस उत्पन्न दाखल्याप्रकरणी तर आता वीज व पाणी कनेक्शनसाठी बोगस दाखला दिल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली. मागाहून त्याला जामिनावर सोडण्यात आले.

दुसऱ्यांदा अटक!

शिवानंद सावंत याला यापूर्वी गेल्या ९ जानेवारीला सिल्वानगर - फोंडा भागात राहणाऱ्या एकाला बनावट उत्पन्नाचा दाखला दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता दुसऱ्यांदा बनावट दाखल्यात शिवानंद सावंत अडकल्यामुळे नगरसेवक पदावर आफत येणार की नाही, याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT