Ponda: सत्य न जाणता ढवळीकरांवर आरोप करू नका! बांदोडा सरपंचांचा पाटकरांना सल्ला, मतांचा घोळ झाल्याच्या दाव्याला उत्तर

Sudin Dhavalikar vote controversy: आधी सत्य काय ते पूर्णपणे जाणून घ्या, आणि मगच आरोप करा, अज्ञानाने वागू नका, असे सल्लावजा उत्तर बांदोडा पंचायतीचे सरपंच रामचंद्र नाईक यांनी दिले आहे.
Sudin Dhavalikar vote controversy
Sudin Dhavalikar vote controversyDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: रामनाथी - बांदोड्यात मतांचा घोळ झाल्याचा आरोप करीत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर शरसंधान साधणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि इतरांचा बांदोडा ग्रामसभा निषेध करीत असून आधी सत्य काय ते पूर्णपणे जाणून घ्या, आणि मगच आरोप करा, अज्ञानाने वागू नका, असे सल्लावजा उत्तर बांदोडा पंचायतीचे सरपंच रामचंद्र नाईक यांनी दिले आहे.

बांदोडा पंचायतीच्या पंचमंडळाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केलेले एकाच घरातील ११९ मतदार म्हणजे गौडबंगाल असल्याचे म्हटले होते. त्याला उत्तर देताना सरपंच रामचंद्र नाईक म्हणाले की, हे सर्व मतदार रामनाथी येथील सनातन आश्रमाशी संबंधित साधक आहेत. देशात मतदान करण्यास कुणीही कुणाला अटकाव केलेला नाही.

Sudin Dhavalikar vote controversy
Goa khazan Land Regularisation: आता खाजन जमिनीतील बांधकामे होणार नियमित, 2011 अधिसूचनेपूर्वीची बांधकामे कायदेशीर

त्यामुळे पंचायतीशी नोंद असलेल्या सनातन आश्रमात गेली अनेक वर्षे राहत असलेल्या विविध राज्यातील या लोकांनी आपली मतदान नोंदणी केली आहे. त्यात स्थानिक आमदार, जिल्हा पंचायत सदस्य किंवा सरपंच, पंच कुणाचाही सहभाग नाही. प्रत्येक राज्यात मतदानासाठी ठराविक सोपस्कार पूर्ण करावेच लागतात, आता हे सोपस्कार पूर्ण झाले आहेत की नाही, हे मामलेदार तसेच त्यांच्या अधिकाऱ्यांनी पहायचे असतात.

आमदार सुदिन ढवळीकर हे लोकप्रिय आमदार आहेत, निवडणुकीत त्यांना पडणारी मते ही इतरांपेक्षा सर्वाधिक असतात. त्यामुळे मतांची जुळवाजुळव करण्याची त्यांना गरजच नाही, असे पंचायत मंडळाने स्पष्ट केले.

Sudin Dhavalikar vote controversy
Goa Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळ फेरबदलाचा तिढा काही केल्या सुटेना, गृहमंत्री शहांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

बस्स झाला खोटारडेपणा...!

काँग्रेस पक्षाकडून आतापर्यंत खोटारडेपणाच जास्त झाला आहे. आता तर मडकईतील मतदारांचे प्रकरण काढल्याचा हर्षोल्हास या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि इतरांना झाला आहे, पण हे सत्य नाही, याची त्यांना काडीचीही कल्पना नाही, असा आरोप मगो पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप बखले यांनी केला आहे. आधी आपल्या पायाखाली काय जळते आहे, याचे भान ठेवा, असेही प्रदीप बखले यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com