Ponda: पोर्तुगिजांनी नष्ट केलेला गोवा, मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांनी पुनर्निर्माण केला; मगो पक्षातर्फे आदरांजली

Bhausaheb Bandodkar: दीपक ढवळीकर म्हणाले की, गोव्यात शिक्षणाची गंगा भाऊसाहेबांनी आणली. त्यामुळे गोवा साक्षर होण्यास मदत झाली. मगो पक्षाच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र आणण्यास भाऊसाहेबांनी प्रयत्न केले.
Bhausaheb Bandodkar Death Anniversary
Deepak DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: गोव्याला समृद्धीच्या वाटेवर नेताना पोर्तुगिजांनी नष्ट केलेला गोवा पुनर्निर्माणाचे कार्य गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी केले म्हणून आज समृद्ध गोवा साकारत असल्याचे उद्गार मगो पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दीपक ढवळीकर यांनी काढले.

फर्मागुढी-फोंड्यात भाऊसाहेब बांदोडकर पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी पुष्पांजली अर्पण केल्यानंतर दीपक ढवळीकर बोलत होते. यावेळी युवा नेते मिथिल ढवळीकर तसेच मगो पक्ष केंद्रीय कार्यकारिणी पदाधिकारी अनंत नाईक, प्रताप फडते, नरेश गावडे, जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी, दामोदर नाईक, गणपत नाईक, सरपंच रामचंद्र नाईक, सर्वेश जल्मी, विशांत नाईक इतर पंचसदस्य तसेच मगोप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Bhausaheb Bandodkar Death Anniversary
Bhausaheb Bandodkar: गोवा मुक्त होण्यापूर्वी, अनेक भागांत ‘भाऊसाहेब’ हे नाव लोकप्रिय होते..

शैक्षणिक स्तरावर कार्य करताना भाऊसाहेबांनी बहुजन समाजाबरोबरच कष्टकरी समाजाला दिशा दाखवली म्हणूनच आज प्रत्येकजण स्वतःच्या पायावर उभा आहे. गोव्याची समृद्धी आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहन युवा नेते मिथिल ढवळीकर यांनी केले.

Bhausaheb Bandodkar Death Anniversary
Bhausaheb Bandodkar: ..भाऊसाहेबांना फक्त 10 वर्षेच मिळाली, पण त्यांनी गोव्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली; पुण्यतिथी विशेष

गोवा झाला साक्षर

दीपक ढवळीकर म्हणाले की, गोव्यात शिक्षणाची गंगा भाऊसाहेबांनी आणली. त्यामुळे गोवा साक्षर होण्यास मदत झाली. मगो पक्षाच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र आणण्यास भाऊसाहेबांनी प्रयत्न केले तेच कार्य अव्याहतपणे सुरू असून गोवाभर विखुरलेले मगोप्रेमी हीच गोव्याची खरी शक्ती आहे. भाऊंनी गोव्याला समृद्ध करताना औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय, इतर क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com