Chief Minister Dr. Pramod Sawant Gomantak Digital Team
गोवा

Ponda Panchayat News : कुर्टी-खांडेपार पंचायतीची स्थैर्याकडे वाटचाल; भाजपचे वर्चस्व

कुर्टी - खांडेपार पंचायतही भाजपच्या ताब्यात आल्यामुळे आता फोंडा मतदारसंघात ''ट्रिपल इंजिन'' कार्यरत झाल्याचे दिसायला लागले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा : कुर्टी -खांडेपार पंचायत भाजपच्या कब्जात आली असून विकासासाठी तडजोड केल्याचे सांगण्यात येत असून पंचायतीची स्थिरतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. ''सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही ''असे जे म्हटले जाते, त्याचा प्रत्यय हल्ली सगळीकडेच यायला लागला आहे. पंचायती -नगरपालिका या ''लोकल बॉडी ''असल्यामुळे तिथे ही उक्ती ज्यास्तच अधोरेखित होताना दिसायला लागली आहे.

उपसरपंच विल्मा परेरा यांनी नावेद तहसिलदार यांना दिलेला पाठिंबा काढून तो पाठिंबा भाजपसमर्थक पंचाना दिल्यामुळे परिवर्तनाची जादूची कांडी फिरली गेली आणि त्याची परिणीती भाजपच्या संजना नाईक सरपंच होण्यात झाली. आता अपक्ष असलेल्या भिका केरकर यांनी या पंचायत मंडळाला पाठिंबा दिल्यामुळे हे मंडळ अधिकच बळकट झाल्यासारखे वाटत आहे.

कुर्टी - खांडेपार पंचायतही भाजपच्या ताब्यात आल्यामुळे आता फोंडा मतदारसंघात ''ट्रिपल इंजिन'' कार्यरत झाल्याचे दिसायला लागले आहे. आता गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे पाच समर्थक पंच, म. गो.चे म्हणण्यापेक्षा डॉ. केतन भाटीकरांचे चार समर्थक पंच काँग्रेसचा एक तर एक अपक्ष असे अकरा पंच निवडून आले होते आणि भाटीकरांचे चार, काँग्रेस आणि अपक्ष अशा सहा पंचांनी एकत्र येऊन पंचायत स्थापन केली होती.

नावेद तहसीलदार हे सरपंच तर काँग्रेसच्या विल्मा परेरा या उपसरपंच बनल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भाजपला दूर ठेवण्यात यश मिळवले होते. अर्थात हे समीकरण जास्त दिवस टिकणे शक्य नाही, असा होरा राजकीय तज्ञांनी त्यावेळी व्यक्त केला होता आणि तो होरा आता तंतोतंत खरा ठरला आहे.

भाजप-काँग्रेस सेटिंग?

भाजपचा सरपंच व काँग्रेसचा उपसरपंच असे समीकरण जुळल्यामुळे हे भाजप काँग्रेसचे सेटिंग तर नव्हे असे वाटणे साहजिकच आहे. विद्यमान उपसरपंच विल्मा परेरा यांचे पती जॉन हे फोंड्यातील काँग्रेसचे मोठे नेते. याबाबत उपसरपंच परेरा यांना विचारल्यावर त्यांनी पंचायतीच्या विकासाकरता पाठिंबा दिल्याचे सांगितले.

कृषी मंत्री रवी नाईक हे भाजपचे असल्यामुळे पंचायतीच्या विकासाकरता भाजप पॅनलला पाठिंबा दिल्याचे विल्मा म्हणाल्या. आपण आजही काँग्रेसची सक्रिय सदस्या असून हे सेटिंग नसून विकासाकरता केलेली तडजोड असल्याचा दावा त्यांनी केला.

भाटीकरांचे पंच ‘इंटॅक्ट’

डॉ. केतन भाटीकरांचे चार समर्थक पंच निवडून आले होते, ते आता विरोधी गटात असून अजून तरी ते एकसंघ वाटत आहेत. त्यामुळे पंचायतीतील भाटीकाराची शक्ती घटलेली दिसत नाही. आता ही शक्ती किती दिवस इंटॅक्ट राहते, हे बघावे लागेल. पण सध्या तरी हे चार पंच भाटीकरांबरोबर आहेत, असेच चित्र दिसते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT