Ponda Municipality News : कामाच्या धडाक्यामुळेच रितेशला बक्षिसी!

दुसऱ्यांदा नगराध्यक्षः प्रत्यक्ष काम करण्याची पद्धत, मास्टरप्लॅनवर लक्ष
Ritesh Naik
Ritesh NaikGomantak Digital Team
Published on
Updated on

फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षपदी निवड झालेल्या रितेश नाईक यांचे अभिनंदन करण्यासाठी इच्छुकांची गर्दी झाली. या गर्दीत राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांचा समावेश होता. विशेष म्हणजे दुसऱ्यांदा पालिकेवर निवडून येऊन पुन्हा एकदा नगराध्यक्ष बनण्याचा मान रितेश नाईक यांना मिळाला, तो त्यांच्या कामाच्या बक्षिसीमुळेच!

रितेश नाईक यांची ओळख मागच्या काळात केवळ आमदार पुत्र एवढीच होती. पण फोंडा पालिकेच्या निवडणुकीत प्रथमच उतरून विक्रमी मतांनी निवडून आलेल्या रितेश नाईक यांनी आपल्या कामाचा धडाका फोंडावासीयांना दाखवून दिला. स्वतःची ओळख निर्माण केली. खरे म्हणजे फोंडा पालिकेच्या 2018 सालच्या निवडणुकीनंतर सलग चार वर्षे उल्लेखनीय अशी कोणतीच कामे पालिकेत झाली नाहीत.

Ritesh Naik
GCET 2023 Result: जीसीईटीचा निकाल जाहीर, 'या' तारखेपासून पदवी अभ्यासक्रमासाठी सुरू होणार प्रवेश प्रक्रिया

मात्र चार वर्षांनंतर सरत्या वर्षात रितेश नाईक यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी कामाचा धडाका चालवला. वडील फोंड्याचे आमदार तसेच राज्याचे मंत्री असल्याने ही कामे मार्गी लागण्यात मोठी मदतच झाली. विशेष म्हणजे प्रत्येक प्रभागात विकासकामे आखून त्यानुसार काम करण्याची रितेश नाईक यांची पद्धत.

एखाद्या फाईल्सचा पाठपुरावा राजधानी पणजीत स्वतः करणे, त्यासाठी आवश्‍यक सोपस्कार करणे, सीएसआर उपक्रमाला चालना देणे. अशाप्रकारच्या उपक्रमांमुळे इतर नगरसेवकांनाही रितेशच्या कामाची पद्धत भावली, त्यातूनच रितेश नाईक यांच्याबद्दल त्यांच्या मनातही एकप्रकारचा स्नेह निर्माण झाला, जो पुढच्या म्हणजे यावेळच्या निवडणुकीत रितेशना पुन्हा एकदा नगराध्यक्षपद देऊन गेला.

Ritesh Naik
Smart City Work: स्मार्ट सिटीची कामे अद्याप अपूर्णच; राजधानी पणजीत गटार सफाई सुरूच

मागच्या पालिका मंडळात सुरवातीची चार वर्षे फक्त खुर्चीसाठी सुंदोपसुंदीत गेली. एका नगरसेवकाला फोडून आणायचे आणि सत्ता स्थापन करायची, हाच एककलमी कार्यक्रम मागच्या पालिका मंडळात झाला. मागच्या पालिका मंडळाच्या 2018 मधील निवडणुकीवेळी रवी नाईक हे काँग्रेसचे आमदार होते, आणि काँग्रेस पक्ष विरोधात असल्याने फोंड्यातील कामे अडून राहिली. नंतरच्या शेवटच्या वर्षभरात रवी नाईक भाजपवासी झाले आणि विधानसभेत फोंड्यात विक्रमच झाला. कधी नव्हे तो भाजपचा उमेदवार फोंडा मतदारसंघात निवडून आला.

Ritesh Naik
Catch the Rain' Campaign : कॅच द रेन’ मोहीम घराघरांतून अंमलबजावणी गरजेची

फोंडा पालिकेतही नगरसेवक रितेश नाईक यांची नगराध्यक्षपदाची संधी हुकली होती, पण रवी नाईक पुन्हा सत्तेवर आल्यानंतर परत एकदा खेळी खेळली गेली आणि रितेश नाईक यांची थेट नगराध्यक्षपदी वर्णी लागली. आपल्या कार्यकाळात रितेश नाईक यांनी अनेक कामे मार्गी लावली. विशेषतः फोंड्याचा मास्टरप्लॅन करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

फोंडा मतदारसंघाचा विकास तसा रवी नाईक यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत केला आहेच, पण विकास ही निरंतर प्रक्रिया असल्याने विकासकामे ही होतच राहतात, त्यानुसार फोंड्याचा मास्टरप्लॅन, नवीन मार्केट संकूल, नवीन पालिका इमारत, गोल्डन ज्युबिली प्रकल्प, स्मशानभूमी प्रकल्प असे अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रितेश नाईक यांनी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वीही झाले.

Ritesh Naik
Go First Airlines Crisis: आर्थिक दिवाळखोरीत असलेले 'गो फर्स्ट' पुन्हा विमानसेवा सुरु करण्याच्या तयारीत

आता पुन्हा एकदा नगराध्यक्ष झाल्यामुळे रितेश नाईक यांनी आपल्या मागच्या कार्यकाळात हाती घेतलेल्या विकासकामांना पुन्हा एकदा चालना देण्याचे ठरवले आहे. पत्रकारांशी बोलताना रितेश नाईक यांनी कृषीमंत्री रवी नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतरांच्या सहकार्याने फोंड्याच्या विकासाला चालना देण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे. एकप्रकारे रितेश नाईक यांच्या विकासकामांच्या धडाडीबद्दलच त्यांच्याकडे पुन्हा एकदा नगराध्यक्षपद चालून आले आहे, असेच म्हणावे लागेल.

Ritesh Naik
Hair Growth Tips: हेल्दी अन् चमकदार केस हवेत? मग आजच करा 'हे' काम

निधीची आवश्‍यकता...

फोंडा पालिका क्षेत्रातील विकासकामे साकारण्यासाठी निधीची आवश्‍यकता आहे. सध्या सरकारच्या गंगाजळीत आवश्‍यक तेवढेच पैसे आहेत, त्यातून योग्य नियोजनाचा मार्ग काढताना अर्थमंत्र्यांनाही नाकीनऊ येते, त्यामुळेच राज्याबरोबरच केंद्र सरकारकडूनही निधीचा पाठपुरावा व्हायला हवा. रवी नाईक यांनी आपण राज्य आणि विशेषतः केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पत्रकारांपाशी बोलताना सांगितले आहे, त्यामुळे नजीकच्या काळात नक्कीच फोंड्याचा चेहरामोहरा बदलेल हे नक्की!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com