Mumbai-Goa Vande Bharat Express: मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस चाचणी यशस्वी; सेवेला लवकरच प्रारंभ शक्य

विनाथांबा सात तासांत कापले अंतर
Mumbai-Goa Vande Bharat
Mumbai-Goa Vande BharatDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Mumbai-Goa Vande Bharat Express: मुंबई-गोवा आणि गोवा-मुंबई रेल्वे प्रवास सुखदायी, आरामदायी व केवळ कमी वेळांत पूर्ण व्हावा, यासाठी रेल्वेकडून मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने काल या एक्स्‍प्रेसची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

मुंबईहून सकाळी ५.५० वाजता सुटलेली ट्रेन मडगाव रेल्वे स्थानकावर दुपारी बरोबर १२.५० मिनिटांनी पोहोचली. या एक्स्प्रेसने हे अंतर केवळ ७ तासांत पूर्ण केल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

Mumbai-Goa Vande Bharat
Kiran Kandolkar : 'कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव लोकसभा लढविण्यास इच्छुक'

‘काल केवळ चाचणी घेण्यात आली. ती केव्हापासून नियमित सुरू होईल, हे निश्‍चित नाही. ही रेल्वे भारतीय बनावटीची असून मेक इन इंडिया योजनेंतर्गत विकसीत केली आहे. काल रेल्वेने कुठल्याही रेल्वे स्थानकावर थांबा घेतला नाही, असे घाटगे म्हणाले.

अशी आहेत वैशिष्ट्ये

  • वंदे भारत ट्रेनचा वेग हा ताशी १८० ते २०० किलोमीटर इतका असतो व संपूर्ण डबे एअर कंडिशनर अर्थात वातानुकूलित असतात.

  • जीपीएसच्या आधारित ऑडिओ विज्युअल माहिती प्रणाली यामध्ये असते. तसेच खिडक्या, दरवाजे हे स्वयंचलित असतात.

  • यामध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे व प्रत्येक डब्यात इमर्जन्सी बटन असते. व्हॅक्युम आधारित टॉयलेटचा समावेश असतो. सीट हे १८० डिग्रीमध्ये फिरणारे असतात.

मोदी दाखवणार हिरवा झेंडा!

चाचणी यशस्वी झाल्याने ही एक्स्प्रेस लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई सीएसएमटी-मडगाव मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे, अशी माहितीही समोर आली आहे.

वेळ वाचणार

रेल्वे गाड्यांना मुंबई-गोवा किंवा गोवा-मुंबई अंतर कापण्यासाठी १० ते १२ तास लागतात. ही गाडी काही ठराविक रेल्वे स्थानकांवर थांबेल.

त्यामुळे जास्तीत जास्त ८ तासांत ही एक्स्प्रेस अंतर कापेल. जेणेकरून प्रवाशांचे चार तास वाचतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa 97 Voters Electoral Roll
Nitin Gadkari ashamed Mumbai Goa Highway delay
Mumbai Sawantwadi Daily Express Train Timetable
Vande Bharat  Reel Viral Video
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com