Goa Congress : खनिज वाहतूक कंपनीशी मुख्यमंत्र्यांचा संबंध काय?

काँग्रेसचा सवाल : कंत्राट प्रक्रिया संशयास्पद; स्पष्टीकरण देण्याची मागणी
Congress
CongressGomantak Digital Team

Goa Congress : ई-लिलावातून खनिज वाहतुकीचे कंत्राट मिळालेल्या ''सूर्या ट्रान्स्पोर्ट'' नावाच्या ''बेनामी कंपनी''मध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. या एकाच कंपनीला कंत्राट कसे मिळते? त्यामुळे त्याविषयी संशय गडद होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जनतेला स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी मंगळवारी काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषदेत केली.

काँग्रेस भवनातील पत्रकार परिषदेस सरचिटणीस विजय भिके, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, दक्षिण गोवा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश नाडर उपस्थित होते. स्थानिकांना रोजगार देण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारवर हल्लाबोल करत भिके म्हणाले, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 2012 मध्ये खाणकाम स्थगित केली.

त्यानंतर भाजपने प्रत्येक निवडणुकीत खाण व्यवसाय सुरू करण्याची आश्वासने दिली. पण आजपर्यंत खाण व्यवसाय सुरू झालेला नाही. सद्यस्थितीत सर्व खाण अवलंबित त्रस्त आहेत आणि अनेकांना उत्पन्नाचे साधन नाही.

Congress
Smart City Work: ‘स्‍मार्टसिटी’च्या गलथान कामांमुळे नागरिकांच्‍या जिवाला धोका; काँग्रेस पक्षाची पोलिसांत धाव

लोकसभेवेळी आमिषांना बळी पडू नका!

सरकार नोकऱ्या निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे. मात्र, प्रत्येक निवडणुकीवेळी रोजगार निर्मितीची आश्वासने देतात. भाजपची निवडणूक आश्वासने जुमला ठरली आहेत. पर्रीकर संरक्षणमंत्री असताना त्यांनी 50 ते 80 हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. नंतर सावंत यांनीही 8 ते 10 हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते.

या सगळ्या नोकऱ्या कुठे गेल्या?, असा सवाल त्यांनी केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा नोकऱ्यांचे आश्वासन देईल. राज्यातील युवकांनी भाजपच्या डावपेचांना बळी पडू नये, असे आवाहन भिके यांनी केले.

Congress
Ponda Municipal Council: फोंडा नगराध्यक्षपदी रितेश तर उपनगराध्यक्षपदी दीपा कोलवेकर यांची निवड

‘ती’ वदंता खरी आहे का?

राज्यात अनेक वाहतूक कंत्राटदार आहेत. तरीही एकाच ‘सूर्या ट्रान्स्पोर्ट’ला संपूर्ण राज्यात ई-लिलाव झालेल्या खनिजाचे वाहतूक कंत्राट कसे काय दिले जाते. मंत्री सुभाष फळदेसाई, गणेश गावकर हेसुद्धा वाहतूक कंत्राट घेतात.

ते म्हणाले की, खाणकाम बंद पडल्यामुळे अनेक ट्रकचालक, मालक, यंत्रधारक त्रस्त आहेत, ज्यांना ई-लिलाव खाण खनिज हाताळणीचे काम मिळाले पाहिजे. मुख्यमंत्री ‘सूर्या ट्रान्स्पोर्ट’ फर्ममध्ये भागीदार आहेत किंवा ते ‘बेनामी’ पद्धतीने चालवत असल्याची चर्चा आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे भिके म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com