अक्षय खन्नावर कौतुकाचा वर्षाव, आर. माधवनचा होतोय जळफळाट? म्हणाला, "तो स्वतःमध्येच..."

R. Madhavan on Akshaye Khanna: अक्षयच्या चाहत्यांकडून प्रश्न विचारला जात असतानाच अभिनेता आर. माधवनने यावर आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली.
R Madhavan statement
R Madhavan statementDainik Gomantak
Published on
Updated on

R Madhavan reaction on Akshaye Khanna: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे विक्रम प्रस्थापित केलेत. या चित्रपटात प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली असली, तरी अक्षय खन्नाने साकारलेल्या 'रेहमान डकैत' या पात्राने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. अक्षयच्या या तुफान लोकप्रियतेमुळे चित्रपटातील इतर कलाकार झाकोळून गेले आहेत का? असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जात असतानाच, अभिनेता आर. माधवनने यावर आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली.

"अक्षय या कौतुकासाठी पात्रच"

चित्रपटात अजय सन्यालची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवनला नुकतेच एका मुलाखतीत विचारण्यात आले की, अक्षय खन्नाला मिळणाऱ्या अफाट प्रसिद्धीमुळे तुला असुरक्षित किंवा मत्सर वाटतो का?

यावर उत्तर देताना माधवन म्हणाला, "अजिबात नाही! उलट अक्षयला मिळणारे हे प्रेम पाहून मला प्रचंड आनंद होत आहे. तो या कौतुकासाठी आणि प्रेक्षकांच्या प्रेमासाठी पूर्णपणे पात्र आहे." माधवनने अक्षय खन्नाचे वर्णन एक अत्यंत 'गुणवान' आणि 'जमिनीवर पाय असलेला' अभिनेता असे केले.

R Madhavan statement
चित्रपट हिट, रेहमानचा डान्स सुपरहिट, पण अक्षय खन्ना म्हणतो 'फरक पडत नाही'; धुरंधरच्या यशावर दिलं 3 शब्दांत उत्तर!

यश-अपयशाच्या पलीकडचा कलाकार

अक्षय खन्नाच्या स्वभावावर भाष्य करताना माधवनने सांगितले की, "अक्षय सध्याच्या प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर आपल्या अलिबागच्या नवीन घरात शांततेचा आनंद घेत आहे. त्याला हव्या असत्या तर तो हजारो मुलाखती देऊ शकला असता, पण तो तसा नाही.

मला वाटले होते की मी प्रसिद्धीच्या बाबतीत थोडा संयमी आहे, पण अक्षय तर वेगळ्याच पातळीवर आहे. त्याला यश किंवा अपयश याने काहीही फरक पडत नाही." अक्षयच्या या शांत स्वभावाचे माधवनने मनापासून कौतुक केले.

'धुरंधर'चा भाग असणे हाच अभिमान

माधवनने स्पष्ट केले की, चित्रपटातील कोणत्याही कलाकाराच्या मनात मत्सराची भावना नाही. "धुरंधरसारख्या ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या चित्रपटाचा मी एक भाग आहे, हेच माझ्यासाठी अभिमानास्पद आहे," असे तो म्हणाला.

अक्षय खन्ना किंवा दिग्दर्शक आदित्य धर यापैकी कोणालाही या यशाचे भांडवल करण्यात रस नसल्याचेही त्याने नमूद केले. ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत, मात्र सध्या तरी चर्चा फक्त 'रेहमान डकैत'चीच रंगतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com