Ponda bypoll news Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "एकटा लढेन, मागे फिरणार नाही",पक्ष तिकीट न मिळाल्यास 'स्वतंत्र' लढणार; डॉ. केतन भाटीकर यांची मोठी घोषणा

Ponda By Elections: महाराष्ट्रवादी गोमंत पक्षाचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी आगामी फोंडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीबाबत आपली भूमिका पूर्णपणे स्पष्ट केली

Akshata Chhatre

फोंडा: दिवंगत मंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर फोंड्यातील रिकामी जागा कोण भरणार असा प्रश्न निर्माण झालाय. रवी नाईक यांचे पुत्र रितेश यांना जबाबदारी द्यावी असे अनेकांचे मत असले तरीही महाराष्ट्रवादी गोमंत पक्षाचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी आगामी फोंडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीबाबत आपली भूमिका पूर्णपणे स्पष्ट केली आहे.

माझे दरवाजे बंद नाही

त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जाहीर केले की, जर त्यांना पक्षाचे तिकीट मिळाले नाही, तरीही ते निवडणूक स्वतंत्रपणे लढवतील, मात्र "माघार घेणे हा पर्याय नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

डॉ. भाटीकर यांनी स्पष्ट केले की, त्यांनी आपल्या समर्थकांशी याबद्दल चर्चा केली आहे आणि 'माघार घेणार नाही' या निर्णयावर ते ठाम आहेत. पक्षनेतृत्वाने फोंडा पोटनिवडणूक (by-election) न लढवण्याचे दरवाजे बंद केले असले तरी, "याचा अर्थ माझे दरवाजे बंद आहेत असा नाही," असे भाटीकर यांनी म्हटले.

त्यांनी सांगितले की, योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील. ते पुढे म्हणाले, "मी माझ्या नेत्यांना काय संदेश द्यायचा आहे ते सांगितले आहे. फोंड्यात दुसऱ्या कोणाला आमदार करण्यासाठी मी माघार घेणार नाही, हे अगदी स्पष्ट आहे. कोणीही असो, केतन भाटीकर मैदानात असेल."

रवी नाईक यांच्या पावलांवर चालण्याचा निर्धार

डॉ. भाटीकर यांनी या वेळी दिवंगत नेते रवी नाईक यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. ते म्हणाले की, रवी नाईक यांच्या पावलांवर पाऊल ठेवून फोंडा मतदारसंघातील प्रत्येक समाजाची सेवा करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांनी जोर देऊन सांगितले की, त्यांची बांधिलकी राजकीय सोयीसाठी नसून, जनतेसाठी आहे.

पक्षाचा निर्णय काहीही असला तरी ते तळागाळात काम करत राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या भूमिकेमुळे फोंडा मतदारसंघातील आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे, जिथे एक कार्यकर्ता अपक्ष लढण्याची तयारी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियात 'सूर्य' तळपणार, कांगारुंना करणार सळो की पळो, हिटमॅन-किंग कोहलीचा 'तो' रेकॉर्ड निशाण्यावर?

भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर 'नापाक डोळा'! बांगलादेशात दाखवले आसाम-अरुणाचल; मोहम्मद युनुस यांच्या नकाशा भेटीवरुन नवा वाद

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

Goa electricity tariff hike: आठवड्यात दरवाढ मागे घ्या, अन्यथा...; काँग्रेस - आप शिष्टमंडळाची वीज खात्यावर धडक, आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT