Goa Politics: 'आम्ही कोणाशीही युती करणार नाही', गोव्यात राष्ट्रवादीची एकला चलो रे भूमिका

Goa NCP Politics: राष्ट्रीय महामंत्री आणि प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत गोव्यातील आपल्या पक्षाच्या भविष्यातील धोरणाबद्दल मोठे विधान केले
goa ncp news
goa ncp newsDainik Gomantak
Published on
Updated on

NCP No Alliance Goa: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय महामंत्री आणि प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत गोव्यातील आपल्या पक्षाच्या भविष्यातील धोरणाबद्दल मोठे विधान केले आहे. मागील अनेक वर्षांपासून गोव्यात कार्यरत असलेल्या या पक्षाने, आमदार आणि मंत्री असताना गोव्याच्या जनतेची सेवा केली. मात्र, मागील काही वर्षांमध्ये गोव्याकडे पक्षाचे दुर्लक्ष झाल्याची कबुलीही श्रीवास्तव यांनी दिली.

गोव्यात 'स्वतंत्र' निवडणूक लढण्याची घोषणा

श्रीवास्तव यांनी जाहीर केले की, राष्ट्रवादी काँग्रेसने गोव्यात पुन्हा पक्ष बांधणीचे कार्य सुरू केले आहे. सर्वात महत्त्वाची घोषणा करताना त्यांनी स्पष्ट केले की, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाणार आहे.

पक्षाचे निरीक्षक लवकरच गोव्यात येणार असून, महानगरपालिका, नगरपालिका तसेच जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने लढावे, याबद्दलचे नियोजन केले जाईल. पक्ष कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तसेच येथील स्थानिक प्रश्न घेऊन स्पर्धांच्या माध्यमातून जनतेशी ऋणानुबंध जोडण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कामांमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनाही सक्रिय आहे.

goa ncp news
Goa Politics: 'विरोधकांनी आरशात बघा, नरकासुर दिसेल', कामतांचा टोला; पर्वरी उड्डाणपुलाबाबत संयम बाळगण्याचे आवाहन

विरोधकांची 'एकवटा'

दरम्यान, या राजकीय भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळे चित्र गोव्यातील विरोधी पक्षात पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि रिव्होल्युशनरी गोवन्स या तीनही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत एकजुटीचे प्रदर्शन केले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यावेळी बोलताना भाजपवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "राज्यात जो भ्रष्टाचार आणि अन्यायाचा नर्कासुर अवतरला आहे, त्यावर आळा घालण्यासाठी विरोधकांचा हा एकवट अत्यंत महत्त्वाचा आहे." युरी आलेमाव यांनी स्पष्टपणे सांगितले की, भाजपचा पराभव करायचा असेल तर विरोधी पक्षांनी एकत्र येणे अपरिहार्य आहे.

एकूणच, गोव्याच्या राजकारणात सध्या दोन परस्परविरोधी राजकीय ध्रुव निर्माण होत आहेत: एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आपल्या बळावर स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि रिव्होल्युशनरी गोवन्स हे प्रमुख विरोधी पक्ष भाजपला आव्हान देण्यासाठी युती करण्याची रणनिती आखत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com