Ponda BJP leaders warn Ketan Bhatikar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सावंतांबद्दल काही बरळाल तर खबरदार! केतन भाटीकरांना इशारा; फोंड्यातील भाजप नेते आक्रमक

Ponda BJP leaders warn Ketan Bhatikar: प्रमोद सावंत यांच्यावर टीका केलेल्या केतन भाटीकर यांचा तीव्र शब्दात निषेध करून आणखी काही बरळाल तर गप्प बसणार नाही, असा इशारा भाजप नेत्यांनी दिला.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: मुख्यमंत्री तथा फोंड्याचे पालकमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका केलेल्या केतन भाटीकर यांचा तीव्र शब्दात निषेध करून आणखी काही बरळाल तर गप्प बसणार नाही, असा इशारा फोंड्यातील भाजप नेत्यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत दिला.

या पत्रकार परिषदेला फोंडा नगरध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, नगरसेवक रितेश नाईक, नगरसेवक तथा भाजपचे पक्ष पदाधिकारी विश्वनाथ दळवी, आनंद नाईक आणि भाजप मंडळ अध्यक्ष हरेश नाईक आदी उपस्थित होते.

केतन भाटीकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री राज्याचे की फोंड्याचे अशी विचारणा करून ‘सरकार तुमच्या दारी’वरूनही भाटीकर यांनी टीका करताना छोट्या छोट्या कामांसाठी मुख्यमंत्र्यांच्या फोंड्यात फेऱ्या वाढल्याचे नमूद केले होते. आयडी इस्पितळावरून सर्जन नसल्याची भाटीकर टीका करतात. पण तिथे दोन सर्जन आहेत हे त्यांना माहीत नाही का, असे विचारून रवी नाईक यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी फोंड्याची जबाबदारी पार पाडत आहेत.

कामे साधल्यावर टीका, हा काय प्रकार?

मुख्यमंत्री आणि भाजप मंत्र्यांकडून आपली कामे साध्य करून घ्यायची आणि निवडणूक जवळ आल्यावर भाजपवर टीका करायची हा काय प्रकार आहे, असा सवाल करुन पर्पल फेस्टिव्हलचा भाजपकडून भाटीकर यांनी कसा फायदा करून घेतला याची सर्वांना माहिती आहे. भाटीकर सध्या काहीबाही बरळत आहेत, असे विश्वनाथ दळवी म्हणाले. आता भाजपवाले गप्प बसणार नाही असा इशारा रितेश नाईक, आनंद नाईक यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT