Natasa Stankovic Goa Vacation: हार्दिक पांड्याची एक्स-वाईफ गोव्याच्या किनाऱ्यावर! नताशाचा किलर अन् सिझलिंग लूक घालतोय 'मोहिनी'; हटके अंदाज व्हायरल

Hardik Pandya EX Wife Goa Vacation: नताशा सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगातून बाहेर पडून आयुष्याचा आनंद घेताना दिसत आहे.
Hardik Pandya EX Wife Goa Vacation
Natasa Stankovic Goa VacationDainik Gomantak
Published on
Updated on

Natasa Stankovic Goa Vacation: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर त्याची पहिली पत्नी आणि मॉडेल नताशा स्टेनकोविक सतत चर्चेत असते. नताशा सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगातून बाहेर पडून आयुष्याचा आनंद घेताना दिसत आहे. नुकतेच तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर गोव्यातील सुट्ट्यांचे काही खास फोटो शेअर केले, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. गोव्याच्या किनारी बिकिनीमध्ये 'चिल' करतानाचे नताशाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तिचा हा अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे.

घटस्फोटानंतर नताशाने पुन्हा एकदा आपल्या लाइफस्टाईल आणि करिअरवर लक्ष केंद्रित केले आहे. गोव्यातील (Goa) या व्हॅकेशनमध्ये नताशा अतिशय आलिशान जीवनशैलीचा आनंद घेताना दिसली. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती केवळ समुद्रकिनारीच नाही, तर तिथल्या खाद्यपदार्थांचा आणि आल्हाददायक वातावरणाचाही मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. एका फोटोमध्ये तिने आपल्या बेडरुममधील मिरर सेल्फी शेअर केला आहे, तर दुसऱ्या एका फोटोत ती शॉर्ट ड्रेसमध्ये मनमोकळेपणाने हसताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हा आनंद पाहून ती आता आयुष्यात सकारात्मकरीत्या पुढे जात असल्याची प्रचिती येते.

Hardik Pandya EX Wife Goa Vacation
Sara Tendulkar In Goa: सचिनची लेक सारा गोव्यात घेतेय सुट्ट्यांचा आनंद, बीच लूक चर्चेत; पाहा व्हिडिओ

नताशाची ही बोल्ड आणि ब्युटीफुल अदा पाहून तिचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. कठीण काळानंतर तिला पुन्हा एकदा आनंदी आणि स्वछंदी आयुष्य जगताना पाहून तिचे हितचिंतक समाधान व्यक्त करत आहेत. नताशा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि आपल्या दैनंदिन आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. गोव्यातील तिचे हे लेटेस्ट फोटो सध्या ग्लॅमरस विश्वात चर्चेचा विषय ठरले असून तिच्या फॅशन सेन्सचेही कौतुक होत आहे.

Hardik Pandya EX Wife Goa Vacation
Sara Tendulkar Goa Vacation: सारा तेंडुलकरचे गोवा व्हेकेशनचे फोटो व्हायरल! मिस्ट्री मॅनसोबतच्या जवळीकतेने सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कोण आहे तो?

नताशा स्टेनकोविकच्या करिअरचा प्रवास पाहिला तर तिने सर्बियामध्ये डान्स आणि मॉडेलिंगपासून सुरुवात केली होती. 2012 मध्ये ती बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आली. तिने काही चित्रपटांत आणि डान्स नंबर्समध्ये काम केले असले, तरी तिला खरी लोकप्रियता भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबतच्या (Hardik Pandya) लग्नानंतर मिळाली. या दोघांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडायची, परंतु त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. चार वर्षांच्या संसारानंतर 2024 मध्ये दोघांनी अधिकृतपणे घटस्फोट घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सध्या ते दोघेही आपल्या मुलाची अगस्त्यची को-पेरेंटिंग करत असून मुलाच्या संगोपनासाठी एकत्र येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com