Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: पोलिसांवर गोळीबार म्हणजे गुन्ह्यांची धोकादायक पातळी

युरी आलेमाव : सुरक्षेसाठी कृती योजना हवी

गोमन्तक डिजिटल टीम

Yuri Alemao मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गुन्हेगारी माफियांना प्रोत्साहन दिल्याने गोव्याचे गुन्हेगारी स्थळ बनले आहे. वास्कोत एमईएस कॉलेजजवळ पोलिसांवरच गोळीबार म्हणजे राज्यात गुन्ह्यांनी धोकादायक पातळी गाठल्याचे द्योतक आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.

झुआरीनगर येथील एका बंगल्यावर सशस्त्र दरोडा आणि लोटली येथील वृद्ध महिलेकडून सोने हिसकावून घेण्याच्या प्रकारावर सरकारवर शरसंधान साधताना, आलेमाव यांनी नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी सरकारने कृती योजना आखावी, अशी मागणी केली.

मणका नसलेले पोलिस दल

राज्यात कायदा-सुव्यवस्था कोलमडली आहे. चोरांनी पोलिसांवर गोळ्या झाडणे आणि वृद्धेकडून सोने हिसकावून घेण्याचा दिवसाढवळ्या प्रयत्न म्हणजे पोलिस विभाग म्हणजे पाठीचा मणका नसलेले दल बनले आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. गोव्यातील गुन्हेगारांच्या बदलत्या कारवाया पाहता पोलिसांना अत्याधुनिक उपकरणे आणि वाहने देण्याची गरज आहे, असे आलेमाव म्हणाले.

भाजप सरकारला इव्हेंट्स आणि मिशन टोटल कमिशनचे वेड लागले आहे. लोकांच्या समस्यांकडे बघायला त्यांच्याकडे वेळ नाही. गोव्यातील जनतेने असंवेदनशील, बेजबाबदार आणि भ्रष्ट भाजपला धडा शिकवण्याची वेळ आली आहे.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Cattles: रेडेघाटीतील भटक्या गुरांचा संचार आवरा, वाहनचालकांची मागणी; रस्त्यावर बसणाऱ्या गुरांमुळे मनस्ताप

सोनसोडो प्रकल्प परिसरात 20 टन वैद्यकीय कचरा, मडगाव पालिकेवर होणार कारवाई; प्रदूषण नियंत्रण मंडळाची पालिकेला नोटीस

Verna Fire: भंगारअड्ड्याच्या मालकाचे सर्व आरोप खोटे, शरीफ कोणतेही भाडे देत नसल्याचा जुझे कुटुंबीयांचा दावा

Vasco Bangalore Special Train: नाताळ आणि नववर्षानिमित्त धावणार विशेष रेल्वेगाड्या, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Shilpa Shetty Goa Hotel: शिल्पा शेट्टीच्या 'बास्टिन रिव्हेरा' हॉटेलवर पडणार हातोडा? खारफुटीच्या जमिनीत बांधकामास परवानी कशी? कोसंबेंचा सवाल

SCROLL FOR NEXT