Mandovi River Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पिळगाव येथे मांडवी नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु!

Mandovi River, Pilgao: पिळगाव येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिळगाव येथे मांडवी नदीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

Manish Jadhav

पिळगाव येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिळगाव येथे मांडवी नदीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह पाण्याबाहेर काढला.

पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. या अज्ञात व्यक्तीचा खून करण्यात आला की त्याने आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना सातत्याने समोर येतायेत.

काही दिवसांपूर्वी, मुर्डीवाडा-नार्वे येथून अशीच घटना समोर आली होती. मुर्डीवाडा-नार्वे येथील मांडवी नदीत (Mandvi River) अज्ञात तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. डिचोली पोलिसांनी तात्काळ घटनेची माहिती अग्निशामक दलाला देताच दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

लिडींग फायर फायटर प्रल्हाद देसाई यांच्या नेतृत्वाखाली शैलेश साळकर (Driver-operator), रावजीराव राणे, जितेश नाईक आणि संदीप गावस या दलाच्या जवानांनी तेथीलच होडीचा वापर करुन मृतदेह नदीतून बाहेर काढला होता. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे पाठवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT