Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Goa Crime News: गृह कर्ज मिळविण्यासाठी मालमत्तेची किंमत मोठ्या प्रमाणात वाढवून अहवाल दिल्याचा आरोप असलेल्या एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि. च्या मडगाव विभागाचे हेमंत सूर्यवंशी यांच्या अटकपूर्व जामिनावर १५ रोजी सुनावणी होणार आहे.
Goa Fraud Case
CanvaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गृह कर्ज मिळविण्यासाठी मालमत्तेची किंमत मोठ्या प्रमाणात वाढवून अहवाल दिल्याचा आरोप असलेल्या एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि. च्या मडगाव विभागाचे हेमंत सूर्यवंशी यांच्या अटकपूर्व जामिनावर १५ रोजी सुनावणी होणार आहे.

फातोर्डा पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात मडगावातील मनोजकुमार कोडापुल्ली आणि राय येथील एम. झेव्हीयर हे या प्रकरणातील आणखी दोन संशयित आहेत.

या प्रकरणी फातोर्डा पोलिस स्थानकात संशयितांविरुद्ध २०२२ साली गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याने हेमंत सूर्यवंशी यांनी ५ ऑक्टोबर रोजी मडगाव सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. आतापर्यंत या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात सहावेळा सुनावणी झाली आहे.

Goa Fraud Case
Russian Dj Arrested: धक्कादायक! गोव्यात पहिल्यांदाच GHB Drugs जप्त, रशियन Dj महिलेला अटक

बनावट सही, स्टॅम्पचा वापर

या तिन्ही संशयितांनी कट रचून मालमत्तेचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढवून कर्ज मिळविल्याचा आरोप आहे. हे करताना एलआयसी फायनान्स कंपनीचे हाऊसिंग आर्किटेक्ट आणि पॅनल व्हॅल्युएर जोजेफ केरांचिरा यांची बनावट सही तसेच बनावट रबर स्टॅम्पचा वापर करून ही कागदपत्रे खरी असल्याचा बनाव केल्याचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa journalists vs Gautam Khattar
Fake call centers in Goa
goa crime branch busts two fake call centers
Goa bank manager accused of 64.25 lakh loan fraud case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com