Seize vehicle Dainik Gomantak
गोवा

Goa Police : मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर पोलिस ऍक्शन मोडमध्ये; 11 अल्पवयीन वाहनचालकांच्या पालकांवर कारवाई

अल्पवयीन चालक दिसल्यास वाहनमालकाला होणार अटक

Rajat Sawant

वाहतुकीला शिस्त लागावी, राज्यातील अपघातांच्या प्रमाणात घट व्हावी यासाठी राज्य सरकारने अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास थेट वाहनमालकाला अटक करण्याचा कठोर निर्णय घेतला असल्याचे काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर आता म्हापसा पोलिसांनी अल्पवयीन वाहन चालकांवर करावाई करण्यास सुरुवात केली आहे. म्हापसा उपविभागाच्या पोलिसांनी या कारवाईत 11 स्कुटर व मोटारसाईकल जप्त केल्या आहेत.

म्हापसा उपविभागाच्या पोलिसांनी अचानकपणे अल्पवयीन दुचाकीचालकांविरोधात कारवाईची मोहिम राबवली. या मोहिमेत शाळेच्या परिसरात अल्पवयीन मुले दुचाकीचालवत असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाईत करत 11 स्कुटर व मोटारसाईकल जप्त केल्या आहेत. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलांचे पालक आणि दुचाकी मालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. ही पहिलीच वेळ असल्याने त्यांना ताकीद देण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल शिक्षण विभाग व अन्य अधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. या कारवाईत म्हापसा पोलिसांनी 3 दुचाकी, कोलवाळ पोलिसांनी 7 दुचाकी व हणजुण येथील 1 दुचाकी जप्त केल्या आहेत.

वाहनांच्या मालकांना व पालकांना अल्पवयीन व्यक्तीला मोटार वाहन चालविण्यास परवानगी देणे तसेच अन्य कलमांचे उल्लंघन केल्याबद्दल चलान जारी करण्यात आले आहे. ही कारवाई उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, उपविभागीय पोलीस अधिकारी जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवाळचे पोलीस निरीक्षक सोमनाथ महाजिक, म्हापसा पोलीस निरीक्षक परेश नाईक आणि हणजुणचे पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT