Pernem Police arrest two thieves for stealing tourist literature
Pernem Police arrest two thieves for stealing tourist literature Dainik Gomantak
गोवा

पर्यटकांचे साहित्‍य चोरणाऱ्या दोन चोरांना पेडणे पोलिसांनी केली अटक

दैनिक गोमन्तक

पेडणे: पेडणे किनारी भागात एकत्रितपणे चोऱ्या करणाऱ्या कर्नाटक व केरळमधील दोन चोरट्यांना पेडणे पोलिसांनी कर्नाटक व केरळ पोलिसांच्या सहकार्याने अटक केली. त्यांच्याकडून तब्‍बल 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लथिफ अयुब खान व के. एस. सायडू अझिझ (46) अशी त्‍यांची नावे आहेत.

पेडणेचे पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेडणे किनारि भागातील मोरजी, मांद्रे, हरमल आदी भागात गेल्या दोन महिन्यांपासून विदेशी व देशी पर्यटक राहत असलेल्या घरावर पाळत ठेवून घरफोड्या करुन किमती वस्तू चोर चोरून नेण्याच्या तक्रारी पेडणे पोलिस ठाण्यात येत होत्या.

त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता या चोऱ्यांत कर्नाटक व केरळमधील टोळ्या गुंतल्या असल्याचे आढळून आले. त्यानुसार पेडणे पोलिसांनी केरळ व कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधला व त्यांच्या सहकार्याने किनारी भागात चोऱ्या प्रकरणातील या दोन संशयित आरोपींना चोरीच्या मुद्देमालासह अटक केली.

लथिफ खान व अझिझ हे संशयित घराच्‍या मुख्य दरवाजाचे कुलुप तोडुन किंवा खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करून चोऱ्या करायाचे. गुन्हा केल्यानंतर संशयित केरळ व कर्नाटकमध्ये पळून जात असत. पेडणेचे पोलिस उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विक्रम नाईक, उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, सुमेधा नाईक, कॉन्‍स्‍टेबल राजेश येशी, सागर खोर्जुवेकर, प्रज्योत मयेकर, विशाल नाईक, मिथिल परब यांनी ही कामगिरी फत्ते केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Jetty : खारीवाडा जेटीवर ट्रॉलर्स विसावले; साफसफाईची लगबग

Toll Tax Rate Hiked: प्रवास झाला महाग, लोकसभा निवडणुक संपताच टोल दरात एवढ्या टक्क्यांनी वाढ

Bicholim Road : डिचोली ‘आयडीसी’त रस्ता धुळीने माखला; कामगार त्रस्त

Panaji News : ग्राम पंचायतींच्या नव्या वास्तू दिव्यांगांसाठी त्रासदायक : आवेलिनो डिसा

Panaji News : शैक्षणिक साहित्यालाही महागाईची झळ; १५ टक्क्यांपर्यंत दरवाढीने पालकांचे बजेट कोलमडले

SCROLL FOR NEXT