PM Modi Gold Petrol Appeal Dainik Gomantak
गोवा

National Interest: PM मोदींचे आवाहन राष्ट्रहितासाठी! यतीश नायक विरोधकांवर बरसले, म्हणाले, 'अर्थहीन राजकारण करु नका'

PM Modi Gold Petrol Appeal: सध्या जगात अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्‍ट्रहितार्थ सोने खरेदी, पेट्रोल व इतर वापर कमी करण्यास सांगितला आहे.

Sameer Amunekar

पणजी: सध्या जगात अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्‍ट्रहितार्थ सोने खरेदी, पेट्रोल व इतर वापर कमी करण्यास सांगितला आहे. त्याला नागरिकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद लाभत आहे; परंतु विरोधी पक्ष मात्र अर्थहीन राजकारण करत आहे. यापूर्वीच्या अनेक पंतप्रधानांनी अशी आवाहने केली असल्याचे प्रतिपादन भाजप प्रवक्ते यतीश नायक यांनी केले.

येथील पक्ष कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार ग्लेन टिकलो आणि प्रवक्ते जयंत जाधव उपस्थित होते. नायक म्हणाले, की आज क्रूड ऑईलच्या किमती १०० रुपये प्रतिडॉलरच्या वर गेल्या आहेत. अशा स्थितीतही देशात पेट्रोल चे दर वाढलेले नाहीत. नागरिकांंना गॅस सिलिंडर सहजपणे मिळत आहेत. देशात कसलीच कमतरता भारणार नाही, याला सरकार प्राधान्य देत आहे.

भारतात इंधन दर स्थिर

जगभरात युद्धजन्य स्थिती असली तरी आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली कोणत्याच प्रकारची कमतरता नाही. सिलिंडरपासून सर्व वस्तू नागरिकांना सुरळीतपणे मिळत आहेत. आम्ही पाहिले आहे की, अमेरिकेत देखील पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात भडकले आहेत. असे असताना विरोधकांनी या विषयावर उगाच राजकारण करू नये, असे माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी सांगितले.

मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्‍वास

ज्यावेळी कोरोनासारखी महामारी जगभरावर ओढवली, त्यावेळी भारतात लस तयार करण्यात आली आणि जगभरातील देशांना ती पुरविण्यात आली. त्यामुळे देशाच्या जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाबाबत विश्‍वास असल्याचे जयंत जाधव यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT