PM modi to arrive for Goa Liberation Day celebration tomorrow

 

Dainik Gomantak

गोवा

गोवा मुक्तिदिन सोहळ्यास होणार पंतप्रधानांचे आगमन

यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत (CM Pramod Sawant) म्हणाले, गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवाची सुरवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी केली होती.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवासाठी (Goa Liberation Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उद्या रविवारी गोव्यात येत आहेत. यासाठी राज्य सरकारच्यावतीने (Goa Government) भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत (CM Pramod Sawant) म्हणाले, गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवाची सुरवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी केली होती. आता समारोपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येत आहेत. 19 डिसेंबर रोजी यानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळच्या सत्रात सर्व तालुक्याच्या ठिकाणी संबंधित मंत्री मामलेदार यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. राज्य सरकारचा शासकीय कार्यक्रम पणजीच्या परेड ग्राउंडवर होईल.

दीड वाजता आगमन

पंतप्रधान मोदी हे रविवारी दुपारी 1.30 वा. गोव्यात येतील. त्‍यानंतर आझाद मैदानावर शहिदांना आदरांजली वाहतील. यावेळी नौदल, लष्‍कर आणि पोलिस दलाच्यावतीने मानवंदना दिली जाईल. हा कार्यक्रम 25 मिनिटांचा असेल.

पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे रविवारी बांदोडकर मार्ग वाहतुकीस बंद

गोवा मुक्तिदिनाच्या ६०व्या वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी गोव्यात येत आहेत. त्यांच्या विविध कार्यक्रमामुळे दुपारी 1.30. वाजल्यानंतर पणजीतील दयानंद बांदोडकर मार्गासह बांदोडकर यांचा पुतळा ते बांबोळीपर्यंतचा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना येणाऱ्यांसाठी वाहने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दयानंद बांदोडकर मार्ग (बांदोडकर पुतळा ते मिरामार), जॅक सिक्वेरा मार्ग (मिरामार ते एनआयओ सर्कल) व गोवा विद्यापीठ मार्ग (एनआयओ सर्कल ते ईटीडीसी) हे मार्ग दुपारी दीड वाजल्यानंतर बंद ठेवले जाणार आहेत. मिरामार समुद्रकिनाऱ्यावरील कार्यक्रमांसाठी येणाऱ्या वाहनधारकांसाठी कांपाल परेड मैदान व धेंपे महाविद्यालय येथे तसेच डॉ. श्‍यामाप्रसादर मुखर्जी स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमांना येणाऱ्या वाहनधारकांसाठी ईटीडीसीसमोर तसेच गोवा विद्यापीठाच्या निवासी इमारती तसेच खुल्या जागेत पार्किंगची सोय करण्यात आली आहे. दुपारी 1.30 वाजल्यानंतर सर्व वाहने गोमेकॉ ते गोवा विद्यापीठ रस्त्याने वळवण्यात येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT