गोव्यात होणारे आजचे विशेष कार्यक्रम

पूर्वसंध्येला इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा येथे शिक्षकांसाठी स.9.30वा.पासून वक्तृत्व व वेशभूषा स्पर्धा.
Todays special programs in goa

Todays special programs in goa

Published on
Updated on

पणजी चिंचोळे येथील श्रीपिंपळेश्‍वर दत्तमंदिरात पहाटे 6 वा. काकडारती व पादुकांवर दुग्धाभिषेक, 1वा. महाप्रसाद,3.30 वा. दत्तजन्मावर कीर्तन, 5वा. दत्तजन्म सोहळा, बालदर्शन, सायं. 7वा. भजन,9.30 वा. बँडबाजासह मंदिर आवारात श्रींची पालखी मिरवणूक. गोवा मुक्तीच्या पूर्वसंध्येला इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा येथे शिक्षकांसाठी स.9.30वा.पासून वक्तृत्व व वेशभूषा स्पर्धा.

पर्वरी 60व्या मुक्तिदिनानिमित्त सुकूर पंचायतीतर्फे स. 11वा.फॅन्सी ड्रेस, नृत्य स्पर्धा, दु. 3वा. फुगडी स्पर्धा.

म्हापसा मुक्तीच्या हीरकमहोत्सवानिमित्त टॅक्सी स्टॅण्ड येथे ‘गोमंतगाथा’ कार्यक्रम.

शिवोली ओशेल कालिका पंचायतनाच्या जत्रोत्सवानिमित्त सकाळी विधिवत पूजा-अर्चा, लघुरुद्र, अभिषेक, रात्री 10वा. पालखी मिरवणूक व गणेश दशावतार नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा दशावतारी नाट्यप्रयोग.

मडगाव वार्का श्री दामोदर सालचा वर्धापनदिन. यानिमित्त स. महापूजा व इतर धार्मिक विधी, सायं. 6.30वा. दिंडी. घुडो-अवेडे-केपे शांतादुर्गा चामुंडेश्‍वरी देवी मूर्तिप्रतिष्ठापनेच्या स्मारकोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी, रात्री पालखी मिरवणूक.

<div class="paragraphs"><p>Todays special programs in goa</p></div>
गोवा नदी परिवहन खात्याची आजची परीक्षा रद्द

काणकोण गोवा मुक्तीच्या हीरकमहोत्सवी समितीतर्फे सायं. 4.30वा. मुक्तीच्या 60व्या वर्षानिमित्त दत्ता नाईक यांचे व्याख्यान.

होंडा गोवा मुक्तीच्या हीरकमहोत्सवानिमित्त गावकरवाडा मंडपात सायं. 6वा.कवी संमेलन, गोफ, मुसळ नृत्य, वीरभद्र, घोडेमोडणी, गजनृत्य व रणमाले कार्यक्रम.

फोंडा धारबांदोडा ज्येष्ठ नागरिक फोरमतर्फे किर्लपाल दाभाळ पंचायतक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कोडली तिस्क गणेश मंडपात स. 9 ते 12.30वा.पर्यंत आरोग्य शिबिर.`

मांद्रे जुनसवाडा औदुंबर मठात पहाटे भूपाळी, काकडारती, विविध धार्मिक विधी, दु. महाप्रसाद, सायं. 4वा. दत्तजन्म सोहळा, 6.30वा. प्रवचन व माणिकनाथ स्वामींचे आशीर्वचन, 7.30वा. सुश्राव्य गायन.

पालये भंडारवाडा श्री महापुरुष मंदिरात सत्यनारायण महापूजा, दु. महाप्रसाद, सायं. 4वा. स्थानिक भजनी कलाकारांतर्फे भजन, 7वा. पावणी, रात्री 9.30वा. संतकवी सोहिरोबाथ आंबिये यांच्यावर आधारित ‘म्हणे सोहिरा’ नाटक.

माशेल तारीवाडा साईबाबा मंदिरात दत्तजयंत्युत्सवानिमित्त पहाटे काकडारती, महाभिषेक, दु. 12.30वा. दत्तजन्म सोहळा, महाआरती, महाप्रसाद, रात्री 8.30वा. श्रीदुर्गादत्त मंदिराच्या पालखीचे आगमन.

<div class="paragraphs"><p>Todays special programs in goa</p></div>
नोकरभरती अंगलट! गोवा PWD विभागातील भरती प्रक्रिया स्थगित

मये श्री महामाया देवीच्या कालोत्सवानिमित्त रात्री 10.30वा. ‘सं. संत तुकाराम’ नाटक.

केरी सत्तरी ब्रह्माकरमळी येथील कदंबवाडी वाळवंट येथे दत्तजयंतीनिमित्त सकाळी देवकृत्ये, महापूजा व अभिषेक, दु.12वा. दत्तजन्मावर कीर्तन, जन्मसोहळा, महाप्रसाद, सायं. 4.30वा. ‘स्वरमाला’ हा संगीत कार्यक्रम. त्यानंतर 6.30वा. कुलदेवी सातेरी भजन मंडळाचे भजन.

सावईवेरे घाणो-सावईतील गणेश दत्त मंदिरात दत्तजयंतीनिमित्त गोविंद कामत यांच्यातर्फे पालखी समर्पण सोहळा, सायंकाळी पालखी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com