PM Modi Goa Visit: 600 crore gift on occasion of Goa Liberation Day

 
गोवा

PM Modi Goa Visit: गोवा मुक्ती दिनानिमित्त 600 कोटींची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज 'गोवा मुक्ती दिना'निमित्त (Goa Liberation Day) गोवा दौऱ्यावर आले आहेत. येथे डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित गोवा मुक्ती दिन सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली. यावेळी पंतप्रधान म्हणाले,"गोव्याची भूमी, गोव्याची हवा, गोव्याच्या समुद्राला निसर्गाची अद्भुत देणगी लाभली आहे. आज गोवा मुक्तीचा हीरक महोत्सव साजरा करत नाही तर 60 वर्षांच्या या प्रवासाच्या आठवणीही आपल्यासोबत घेवून जगत आहे. आपल्यासमोर संघर्ष आणि बलिदानाची गाथा आहे, लाखो गोवावासीयांच्या परिश्रमाचे आणि समर्पणाचे फळ आहे, ज्यामुळे आपण खूप पुढे आलो आहोत. गोवा पोर्तुगालच्या अखत्यारीत गेला जेव्हा देशाच्या इतर मोठ्या भागावर मुघलांचे राज्य होते. त्यानंतर या देशाने किती राजकीय वादळे पाहिली, किती सत्तेचा मारा केला ह आपल्याला इतिहासातून दिसून येते."

गोवा आपले भारतीयत्व विसरला नाही

कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "गोवा पोर्तुगालच्या ताब्यात गेला होता जेव्हा देशाच्या इतर मोठ्या भागावर मुघलांचे राज्य होते. त्यानंतर या देशाने अनेक राजकीय वादळे पाहिली, पण वेळ आणि सत्ता यांच्यातील अंतर शतकानुशतके वाढूनही गोवा आपले भारतीयत्व विसरला आहे, ना भारत आपला गोवा विसरला," असे म्हणत यावेळी मोदींनी एक भारत, श्रेष्ठ भारत चा नारा गोव्यात लावला.

अनेक प्रकल्पांचे उद्घाटन

पंतप्रधानांनी आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर शहीदांना आदरांजली वाहिली. मीरामार बीचवर गोवा मुक्ती दिनानिमित्त आयोजित सेल परेड आणि फ्लायपास्टमध्येही ते सहभागी झाले होते. सुमारे 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. यामध्ये सुधारित फोर्ट आगोंदा तुरुंग संग्रहालय, गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी ब्लॉक, न्यू साऊथ गोवा जिल्हा रुग्णालय, मोपा विमानतळावरील एव्हिएशन, स्किल डेव्हलपमेंट सेंटर, गोवा मुक्ती दिन पोस्ट कार्ड - पोस्ट ऑफिस, मेघदूत पोस्ट कार्ड आणि डावरलिम-नवेली, मडगाव येथील गॅस इन्सुलेटेड सब सेंटरचेही उद्धाटन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT