भारत स्वातंत्र्याच्या अमृतमोहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. आणि याच पावन वर्षात आज गोवा मुक्तीचा हिरकमोहोत्सव गोवा साजरा करत आहे. (Goa Liberation Day) गोवा मुक्तीदिनाच्या समारोप सोहळ्याच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा दौऱ्यावर आले आहेत. त्यानिमित्त गोवा राज्य सरकारने रविवारी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गोमंतकीयांना संबोधित केले.
नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे आयोजन श्यामप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर करण्यात आले. यावेळी गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि उपस्थित मान्यवरांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी सावंत यांनी आपले मत व्यक्त केले. "60 व्या गोवा मुक्तीदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्यात आले आहेत. त्यांचे मी गोव्याच्या जनतेकडून हार्दिक स्वागत करतो. आम्हाला केंद्र सरकारकडून 300 कोटी रुपये देण्यात आले. पंतप्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेची आम्ही पारदर्शी पध्दतीने राबवली आहे. गोव्याचा पायाभूत विकास करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी क्षणोक्षणी मदत केली. पंतप्रधानांच्या स्वप्नातील नवभारत निर्माण करण्यासाठी आम्ही गोव्याच्या जनतेबरोबर सातत्याने काम करत राहू." असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी याच्या हस्तेगोवा मुक्ती स्वांतत्र्य स्वातंत्र्यसेनानींना सन्मानित करण्यात आले.
यावेळी पंतप्रधान मोदींनी गोवेकरांना संबोधित केले. गोवा मुक्तीदिनानिमित्त गोव्यातील जनतेला मोदीजींनी कोकणी भाषेत शुभेच्छा दिल्या. "गोव्याच्या धरती, वातावरण आणि समुद्राला प्रकृतीचे अद्भुत वरदान लाभले आहे. आज साठ वर्षातील संघर्ष आणि बलिदानाची गाथाही आपल्या समोर आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यांचा हिरक महोत्सव आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने बदल घडवून आणत आहे." असे म्हणत पंतप्रधानांनी गोवेकरांना गोवा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलताना मोदी म्हणाले, "आत्मभारत योजनेच्या माध्यमातून काम करणाऱ्या पंचायतीचा आज गौरव करण्यात आला. गोव्याचा मुक्तीसंग्राम खऱ्या अर्थाने संघर्ष आणि बलिदानाची कहाणी मांडतो. पोर्तुगिजांच्या ताब्यात आसतानाही गोव्याने गोवापण जपले. त्याचबरोबर गोवा मुक्तीसंग्राम आपल्या इतिहासातील एक अमूर्त पान रोवले. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी गोव्यातील जनतेने आणि स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या जीवची पर्वा न करता पोर्तुगिजांविरुध्द स्वातंत्र्यांचा लढा उभारला."
"गोव्याच्या स्वातंत्र्यांसाठी कितीतरी स्वातंत्र्य सेनानींनी संघर्ष करत करत बलिदानही दिले. स्वातंत्र्यासाठी गोमन्तकशी जोडलेल्या सेनानींने खऱ्या अर्थाने गोवा मुक्तीसाठी लढा उभारला. सरदार वल्लभभाई पटेल अजून काही काळ जिवंत राहीले असते तर गोव्याला स्वातंत्र्यासाठी एवढा काळ लढा द्यावा लागला नसता. गोव्याचं टॅलेंट खऱ्या अर्थाने देशाला उभारी देण्यासाठी अग्रेसर आहे. हर घर नल योजना असो, आधार सेवा, प्रधानमंत्री गरीब योजना असो गोवा सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे," असे म्हणत त्यांनी गोव्यातील स्वातंत्र्य सेनानींनींच्या संघर्षाचे कौतूक केले.
"गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खऱ्या अर्थाने गोव्याच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले. गोव्याच्या विकासासाठी पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी त्यांनी महान कार्य केले. केंद्र सरकारकडून पर्यटन क्षेत्राला लॉकडाऊन नंतर पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असून नव नवे योजनाही राबवत आहे," असे म्हणून त्यांनी यावेळी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मरण केले.
"पीएम गतीशक्ती मिशनला गती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पायाभूत विकासामध्ये पीएम गतीशक्ती मिशन खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देईल. गोव्याला आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य सरकार गोव्यातील प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचत आहे. गोवा आपल्या मुक्तीनंतर भविष्यात कुठे असले यासाठी संकल्प घ्यावा लागणार आहे," गोव्यात राबविण्यात आलेल्या आणि येणाऱ्या विविध योजनांचा माहिती देत पंतप्रधानांनी गोवा मुक्तीदिनाच्या पर्वावर गोवेकरांना संबोधीत केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.