रस्त्याची दुर्दशा Dainik Gomantak
गोवा

काणकोणातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा

वेलवाड्यात खड्डेच खड्डे: उखडलेल्या रस्त्यांना डांबरीकरणाची प्रतीक्षाच

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोणमधील अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. निवडणुकीपूर्वी डांबरीकरण करण्यासाठी काही रस्त्यांची झाडलोट करण्यात आली होती; मात्र त्यानंतर त्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. पैंगीण पंचायत क्षेत्रातील वेलवाडा येथील अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी डांबर उखडून खड्डे पडले आहेत.

पालिका क्षेत्रातील पणसुले रस्त्याची वाताहत झाली आहे. या रस्त्यांवर अपघातांना कारणीभूत ठरणारे खड्डे आहेत. किमान हे खड्डे बुजवण्यात यावेत, अशी मागणी पणसुलेवासीय करत आहेत.

या रस्त्यांवर वाहने सोडाच चालणेसुद्धा कठीण बनल्याचे आल्फर फर्नांडिस यांनी सांगितले. किमान पावसाळ्यापूर्वी दूरवस्था झालेल्या अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. असे रस्ते पैंगीण, गावडोंगरी, खोतीगाव, श्रीस्थळ, आगोंद व पालिका क्षेत्रात आहेत. तालुक्यातील दुर्दशा झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT