Union Home Minister Amit Shah Dainik Gomanatk
गोवा

Goa Election 2022: अमित शहांचा असा आहे आजचा गोवा दौरा

एकदिवसीय दौरा : फोंडा, वास्कोत सभा

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रविवारी एकदिवसीय गोवा दौऱ्यावर येत आहेत. ते दोन जाहीर सभांसह तीन ठिकाणच्या प्रचारात सहभागी होतील. त्यांच्या वास्कोतील सभांचे डिजीटल माध्यमांतून लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे Sadanad sheth tanawade यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपचे प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते. (planning of Union Home Minister Amit Shah Goa tour)

तानावडे म्हणाले, भाजपच्या Goa BJP प्रचारासाठी 11 जानेवारीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, गृहमंत्री अमित शहा Union Home Minister Amit Shaha, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण, तसेच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व इतर नेत्यांच्या सभा गोव्यात होत आहेत. आज रविवारी अमित शहा हे गोव्यात येत आहेत. संध्याकाळी 3.30 वा. शिरोडा व फोंडा मतदारसंघातील उमेदवारासाठी हॉटेल सनग्रेस गार्डनमध्ये शहा यांची सभा होणार आहे. कोरोनामुळे निवडक कार्यकर्त्यांची उपस्थिती असेल. शहा यांच्या सर्व सभा राज्यातील विविध भागात स्क्रीन उभारून, सभागृहांमध्ये आणि खुल्या जागेत स्क्रीनद्वारे लाईव्ह प्रक्षेपित केल्या जातील. सोशल मीडिया तसेच काही वृत्तवाहिन्यांवर या सभा थेट दाखवल्या जातील अशी माहिती तानावडे यांनी दिली.

दरम्यान, भाजपचे प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी तृणमूलच्या Goa TMC जाहीरनाम्यावर टीका केली. पश्चिम बंगालमध्ये पंधरा वर्षे तृणमूल पक्षाचे सरकार आहे. देशातील सर्वात जास्त गरिबी या राज्यात आहे. तेथे एकही योजना न राबवता गोव्यातील सत्ता प्राप्त करण्यासाठी एका विशिष्ट समाजाला पुढे करून तृणमूल गोव्यात राजकीय जिहाद राबवत आहे.

त्याला अनेक नेते बळी पडले. लवू मामलेदार, यतीश नाईक यांच्यासारख्यांना सत्य परिस्थिती कळल्यानंतर त्या पक्षातून ते बाहेर पडले. आलेक्स रेजीनाल्ड सारख्या नेत्याची स्थिती या पक्षाने ना घर का ना घाट का अशी केली. स्वतःच्या राज्यामध्ये एकही योजना न राबवणारा पक्ष गोव्यातील लोकांना मात्र ५० हजार घरे व इतर सवलती देण्याची घोषणा जाहिरनाम्यात करतोय. त्यांनी स्वतःच्या राज्यात या योजना का जाहीर केल्या नाहीत ? याचा खुलासा अगोदर त्यांनी करणे गरजेचे आहे असे सिद्धार्थ कुंकळ्येकर म्हणाले. शारदा मंदिर हॉल सावर्डे येथे भाजप उमेदवार गणेश गावकर यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी ५.२५ वाजता अमित शाह यांची दुसरी सभा होईल. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता वास्को येथे अम्ब्रेला कॅम्पेनचे उद्‍घाटन होणार आहे. यामुळे राज्यभरातील सर्व मतदारसंघात प्रचाराला सुरवात होणार आहे. वास्कोच्या रेल्वे सभागृहात आयोजित या कार्यक्रमात अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत. कोरोना नियमाचे पालन करून होणाऱ्या एकूण तीन सभांमध्ये मोजके कार्यकर्ते सहभागी होतील.

असा आहे दौरा

  • 2.00 वा. गोव्यात आगमन

  • 2.45 वा. साईबाबा दर्शन बोरी. 3.30 वा. ग्रेस गार्डन, फोंडा जाहीर सभा.

  • 5.00 वा. घरोघरी प्रचार सावर्डे. 5.25 वा. शारदा मंदिर हॉल, सावर्डे प्रचारसभा

  • 7. 00 वा. अम्ब्रेला रेल्वे हॉल, वास्को प्रचारसभा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT