Goa Legislative Assembly  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election: फोंड्यात विधानसभा निवडणुकीचे नियोजन सुरू

Goa Assembly Election: चुरशीचे संकेत: म. गो.च्या केतन भाटीकरांचे ‘एकला चलो रे’ धोरण

दैनिक गोमन्तक

मिलिंद म्हाडगूत

Goa Assembly Election: विधानसभा निवडणूक तीन सव्वा तीन वर्षे दूर असूनही फोंड्यात मात्र या निवडणुकीचे नियोजन सुरू झाले आहे. फोंडा मतदारसंघ हा भाजपच्या अखत्यारीत असून प्रथमच या मतदारसंघावर भाजपने कब्जा केला आहे. आत्तापर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता.

रवी नाईक काँग्रेसमध्ये असताना ते 2012 सालचा अपवाद वगळता या मतदारसंघातून मोठी आघाडी घेऊन विजयी झाले होते. पण 2022 साली रवींनी भाजपमध्ये उडी घेतल्यावर त्या मतदारसंघाचे चित्र बदलले व 77 मतांनी का होईना पण भाजपच्या रवी नाईकांनी या मतदारसंघावर विजयी झेंडा रोवला.

या सर्व घडामोडी घडत असताना गेल्यावेळेला फक्त 77 मतांनी पराभव प्राप्त झालेले मगोपचे डॉ. केतन भाटीकर यांनी ‘एकला चलो रे’ हे धोरण अवलंबल्याचे प्रत्ययाला येत आहे. या धोरणाचा त्यांना नुकत्याच पार पडलेल्या फोंडा नगरपालिका निवडणुकीत चांगला फायदा झाल्यामुळे हे धोरण ते आगामी विधानसभा निवडणुकीत वापरू शकतात, असा होरा व्यक्त होत आहे. मगो पक्ष सध्या सरकारात असल्यामुळे आगामी निवडणुकीत मगो पक्ष स्वतंत्ररीत्या उतरेल, की भाजपशी युती करेल, हे सांगणे सध्या तरी कठीण आहे.

आता 2027 साली रवी रिंगणात उतरण्याची शक्यता नसल्यामुळे भाजपची उमेदवारी कोणाला यावर सध्या मतदारसंघात चर्वितचर्वण सुरू आहे. रवी हे विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांच्या पुत्राला येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची अधिक शक्यता वाटते. दुसऱ्या बाजूला फोंड्याचे माजी नगराध्यक्ष विश्‍वनाथ दळवी हे आपले मोहरे पुढे दामटताना दिसतात. ते सध्या फोंडा भाजपचे गटाध्यक्ष असल्यामुळे ते उमेदवारीवर दावा करू शकतात, अशी चर्चा आहे.

काँग्रेसच्या छावणीत सध्या ‘ठंडा ठंडा कुल कुल’ असे वातावरण वाटत असले तरी गेल्या खेपेला काँग्रेसेच उमेदवार असलेले राजेश वेरेकर हे कुंपणावर असून संधीची वाट पाहताना दिसत आहे. गेल्या वेळी हुकलेला विजय यावेळी प्राप्त करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केल्याचे मिळालेल्या माहितीवरून कळते.

त्यांची काँग्रेसची उमेदवारी निश्‍चित असल्यामुळे त्यांना ती चिंता नाही. फक्त गेल्या वेळी निसटलेला हा फोंड्याचा गड परत कॉग्रेसकडे कसा आणावा याचे नियोजन त्यांनी सुरू केल्याचे दिसते. आता त्यात ते किती यशस्वी होतात, हे आता लोकसभेच्या निवडणूकीच्या वेळी कळून येईल.

केतन भाटीकर अग्रेसर!

फोंड्यात केतन भाटीकर हे सध्या सावध पावले उचलताना दिसत आहेत. मतदारसंघातील अनेक सामाजिक कार्यात ते अग्रेसर असल्याचे बघायला मिळत आहे. भाटीकर यांच्या पाठीशी भाजप सरकारातील एक मंत्री असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. अशा सगळ्या जर तरच्या समीकरणामुळे फोंड्याची आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होईल, याचे संकेत आतापासूनच मिळायला लागले असून लोकसभा निवडणुकीत वेगळे चित्र दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT