Guirim Pipeline Burst Dainik Gomantak
गोवा

Guirim Pipeline Burst: गिरी सर्विस रोडनजीक असलेली पाईपलाईन फुटली; हजारो लिटर पाण्याची नासाडी

संबंधित पाईपलाईन नेमकी कशामुळे फुटली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

दैनिक गोमन्तक

Guirim Pipeline Burst: गोव्यात सध्या ठिकठिकाणी रस्त्यांचे काम सुरू आहे. यामुळे कित्येक ठिकाणी जलवाहिनी फुटल्याच्या घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, गिरी येथील सर्विस रोडनजीक असलेली पाईपलाईन फुटल्याची माहिती समोर आली आहे.

गिरी सर्विस रोड हा नेहमीचा रहदारी असलेला मार्ग आहे. यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मात्र जलवाहिनी फुटल्यामुळे इथे आता वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

जलवाहिनी फुटल्यापासून कोणतेही संबंधित अधिकारी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

ही पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. राज्यभारत एकीकडे पाण्याची समस्या इतकी गंभीर बनली आहे की नागरिक पाण्यासाठी आंदोलने करत आहेत तर, दुसरीकडे पाईपलाईन फुटण्याच्या वाढत्या घटनांमुळे शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

संबंधित पाईपलाईन नेमकी कशामुळे फुटली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: गोव्याच्या तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय अद्याप निश्चित झालेले नाही: मुख्यमंत्री

Goa Filmcity: गोवा फिल्म सिटीच्या नावाखाली 'बाहेरच्या' कलाकारांना, तंत्रज्ञांना प्रस्थापित करण्याची योजना तर नाही ना?

Goa Politics: विधानसभा कामकाजावेळी, सरकारी कार्यालयातील टेबले 'रिकामी' का असतात?

Team India Record: अखेर भारतानं करून दाखवलं! 148 वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या नावावर असलेल्या 'या' विश्वविक्रमावर भारताचा कब्जा

Goa Crime: रशियन महिलेने केली गांज्याची शेती, जामीनावर बाहेर, रशियातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार सुनावणीत सहभागी

SCROLL FOR NEXT