Pilgaon Panchayat Dainik Gomantak
गोवा

Pilgaon Panchayat: आम्हाला 'फ्लायओव्हर' नकोच, पिळगाव ग्रामसभेत ठराव; 'मायनिंग' विषयही गाजला

Pilgaon Panchayat mining issue: पिळगाव पंचायतीच्या ग्रामसभेत खाणीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. तसेच खाण कंपनीच्या ‘फ्लायओव्हर’ प्रस्तावाविरोधात ठराव संमत करण्यात आला.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: पिळगाव पंचायतीच्या ग्रामसभेत खाणीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. तसेच खाण कंपनीच्या ‘फ्लायओव्हर’ प्रस्तावाविरोधात ठराव संमत करण्यात आला. सारमानस भागातील खनिज खाणीवर सुरू असलेली रात्रपाळी (थर्ड शिफ्ट) बंद करा, तसेच खनिज वाहतुकीमुळे चिखलाच्या दलदलीतून सुटका मिळण्यासाठी पावसाळ्यात सारमानस रस्त्यावरून होणारी खनिज वाहतूक पूर्णपणे बंद ठेवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

त्याचबरोबर खाण कंपनीच्या ‘फ्लायओव्हर’ प्रस्तावाला कडाडून विरोध करीत तसा ठरावही ग्रामसभेत संमत करण्यात आला. पावसाळ्यात खनिज वाहतूक बंद ठेवली नाही, तर त्याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला. यासंबंधी मंगळवारी संबंधित खनिज खाण कंपनीला पंचायतीतर्फे निवेदन देण्यात येईल, अशी ग्वाही प्रभारी सरपंच उमाकांत परबगावकर यांनी ग्रामसभेत दिली.

पिळगाव पंचायतीची ग्रामसभा रविवारी पंचायत सभागृहात पार पडली. पंचायत सचिव प्रवीण परब यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केल्यानंतर ग्रामसभेला सुरुवात झाली. आजच्या ग्रामसभेला सर्व सातही पंचसदस्य उपस्थित होते.

खनिज वाहतुकीसाठी सारमानस येथे ‘फ्लायओव्हर’ उभारण्याचा खाण कंपनीचा विचार असून, तसा प्रस्तावही कंपनीने पंचायतीला सादर केला आहे. मात्र, या प्रस्तावाला ग्रामस्थांनी विरोध करीत तसा ठरावही ग्रामसभेत घेतला. आधीच नियमबाह्य आणि बेधुंद खनिज वाहतुकीमुळे सारमानस भागातील लोक पुरते त्रस्त झाले आहेत. त्यातच ‘फ्लायओव्हर’ झाल्यास रात्रंदिवस खनिज वाहतूक सुरू राहणार.

‘फ्लायओव्हर’ झाल्यास सारमानस गाव उध्वस्त होणार, अशी भीती माजी सरपंच महेश वळवईकर, मेघनाथ परब, अनिल सालेलकर आदी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

सरपंचपदावरून नाराजी

पिळगाव पंचायतीचे सरपंचपद महिलेसाठी राखीव आहे. मात्र, तीन महिला पंचसदस्य असूनही महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीवेळी सरपंचपदी महिलेची निवड का झाली नाही, असा प्रश्न माजी सरपंच संदीप सालेलकर यांनी उपस्थित करून नाराजी व्यक्त केली.

सारमानस नदीतील गाळ उपसून अडथळा ठरणारी टोंकच्या बाजूने असलेली झाडेझुडपे छाटून सारमानस फेरीसेवा सुरळीत करा, अशी मागणी निलेश हळर्णकर यांनी केली. ग्रामसभेस ५१ ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT