Sanjivani Sugar Factory: साखरेसोबतच इथेनॉल निर्मितीचेही पूर्ण स्वातंत्र्य! खासगी एजन्‍सीला 'संजीवनी'चे पीपीपी तत्त्वावर 30 वर्षांचे कंत्राट

Sanjivani Sugar Factory 30 year contract: ‘‘संजीवनी साखर कारखान्‍याची निविदा ज्‍या खासगी एजन्‍सीला मिळालेली आहे, त्‍या एजन्‍सीला साखरेसह इथेनॉल निर्मितीचेही पूर्ण स्‍वातंत्र्य देण्‍यात येणार आहे.
Sanjivani Sugar Factory
Sanjivani Sugar FactoryDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: ‘‘संजीवनी साखर कारखान्‍याची निविदा ज्‍या खासगी एजन्‍सीला मिळालेली आहे, त्‍या एजन्‍सीला साखरेसह इथेनॉल निर्मितीचेही पूर्ण स्‍वातंत्र्य देण्‍यात येणार आहे. या एजन्‍सीला ३० वर्षांचे कंत्राट देण्‍यात आले आहे’’, अशी माहिती सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) खात्‍याचे संचालक राजन सातार्डेकर यांनी शनिवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

राज्‍यातील एकमेव संजीवनी साखर कारखाना गेल्‍या काही वर्षांपासून बंद ठेवला होता. राज्‍यातील उत्‍पादकांचा ऊस इतर राज्‍यांतील साखर कारखान्‍यांना पाठवून सरकार त्‍यांना सबसिडी देत होते. परंतु, राज्‍यातील हा एकमेव कारखाना पुन्‍हा सुरू करून ऊस उत्‍पादकांना दिलासा मिळवून देण्‍याची मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार होत होती.

Sanjivani Sugar Factory
Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

त्‍यासाठी गेल्‍या काही वर्षांत ऊस उत्‍पादकांनी आंदोलनेही छेडली होती. त्‍यांच्‍या मागणीची दखल घेत सरकारने सुरुवातीला संजीवनी साखर कारखान्‍याच्‍या ठिकाणी इथेनॉल निर्मितीचा प्‍लान्‍ट सुरू करण्‍याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्‍यासाठी बोलीदार मिळत नव्‍हता.

साखरेला असेल प्राधान्‍य : राजन सातार्डेकर

कारखान्‍याबाबत नव्‍याने निविदा जारी करताना आम्‍ही बाजाराचा परिपूर्ण अभ्‍यास केला आहे. संजीवनी साखर कारखान्‍यात साखरेला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. परंतु, ऊसाचा हंगाम केवळ तीन महिन्‍यांपुरता असतो. त्‍यातून नफा मिळणे, कर्मचाऱ्यांचे वर्षभराचे वेतन देणे, यंत्रसामग्रीची वेळेवर डागडुजी करणे शक्‍य नाही.

त्‍यामुळे ऊसाचा हंगाम संपवून साखरेचे उत्‍पादन घेतल्‍यानंतर कारखान्‍यातून इथेनॉल निर्मितीचे स्‍वातंत्र्य एजन्‍सीला देण्‍यात येणार आहे. राज्‍यातील शंभर टक्‍के ऊस उत्‍पादकांचा ऊस प्रथम घेणे आणि तो कमी पडल्‍यास इतर राज्‍यांतून ऊस मागवणे अशी अट एजन्‍सीला घातली आहे, असेही सातार्डेकर यांनी नमूद केले.

Sanjivani Sugar Factory
Goa Health Checkup: राज्यातील तपासणी शिबिरांत 20 जणांना कर्करोगाचे निदान, साडेपाच हजार जणांची आरोग्य तपासणी

केवळ इथेनॉल प्‍लान्‍टसाठी जारी केलेल्‍या निविदांना प्रतिसाद मिळाला नव्‍हता. अखेर एका एजन्‍सीने पीपीपी तत्त्वावर कारखाना सुरू करण्‍यास होकार दिला आहे. या एजन्‍सीला कारखान्‍यातून साखर आणि इथेनॉल निर्मितीचे स्‍वातंत्र्य देण्‍यात येणार आहे.

- राजन सातार्डेकर, संचालक, पीपीपी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com