Griha Aadhar Scheme: विधानसभा निवडणुकीपूर्वीच 'गृहआधार' मानधनात होणार वाढ, डिचाेलीतील नारी शक्ती महोत्सवात CM प्रमोद सावंतांची घोषणा

Goa Griha Aadhar honorarium increase: आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी गृहआधार योजनेच्या मानधनात वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली येथे केली.
Griha Aadhar Scheme
Griha Aadhar SchemeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी गृहआधार योजनेच्या मानधनात वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली येथे केली.

येथील हिराबाई झांट्ये स्मृती सभागृहात भाजपच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत नारी शक्ती महोत्सवात ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, माजी सभापती राजेश पाटणेकर, भाजप सरचिटणीस सर्वानंद भगत आणि मान्यवर उपस्थित होते.

Griha Aadhar Scheme
Goa Tourism: पर्यटन हंगामात यंदा दाबोळीत 144 चार्टर्ड विमाने! 26 हजार परदेशी पर्यटक येणार, विमानतळ प्रशासनाची माहिती

मुख्यमंत्री म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू करतानाच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी ३३ टक्के आरक्षण, बेटी बचाओ, बेटी पढाओ, लखपती दीदी, विमा सखी, उजाला आदी महत्त्वाकांक्षी योजना सुरू करून महिलांचे सशक्तीकरण केले आहे.

मोदी सरकारच्या कार्यकाळात साडेतीन हजार स्वयंसाहाय्य गटांची नोंदणी झाली असून, ५० हजार महिला स्वयंसाहाय्य गटांशी जोडल्या गेल्या आहेत. स्वयंसाहाय्य गटांच्या माध्यमातून आतापर्यंत ३४० कोटींची उलाढाल झाली. यावेळी सदानंद शेट तानावडे, डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांनीही विचार व्यक्त केले.

वेर्णात महिलांसाठी मोफत वसतिगृह

साधनसुविधात्मक विकास करतानाच भाजप सरकारने नारी शक्तीला सक्षम करण्यावर अधिक भर दिला आहे. विकसित भारत संकल्पनेंतर्गत महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी विविध योजना राबविल्या असून, महिलांच्या सेवेसाठी हेल्पलाईनही सुरू केली आहे. असे सांगतानाच मुख्यमंत्री सावंत यांनी, ‘आयडीसी’मध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी लवकरच वेर्णा येथे मोफत वसतिगृह सुरू करणार असल्याचे सांगितले.

Griha Aadhar Scheme
Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

‘गोवा राखण यात्रे’ची खिल्ली

काँग्रेसने राज्यात सुरू केलेल्या ‘गोवा राखण यात्रे’वर मुख्यमंत्र्यांनी टीका केली. प्रत्येक गावात राखणदार आहे. त्यामुळे गोव्यात राखण यात्रेची गरज नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या यात्रेची खिल्ली उडविली. दामू नाईक म्हणाले, की काँग्रेसच्या राजवटीत जनतेच्या पदरी फक्त निराशाच पडली. गोवा राखण यात्रा ही काँग्रेसची फसवी धडपड असून, भाजप सरकारच्या कार्यापुढे काँग्रेसचा टिकाव लागणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com