Election Commission: निवडणूक आयोग घेणार सज्जतेचा आढावा, विशेष बैठका घेणार; 7 ते 8 ऑक्टोबर दरम्यान गोवा दौरा

Election Commission Goa visit October 2026: भारतीय निवडणूक आयोगाचे उच्चस्तरीय पथक पुढील महिन्यात गोवा दौऱ्यावर येणार असून, हे पथक ७ आणि ८ ऑक्टोबर असे दोन दिवस गोव्यात असणार आहे.
Election Commission Goa visit October 2026
Election Commission Goa visit October 2026Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: भारतीय निवडणूक आयोगाचे उच्चस्तरीय पथक पुढील महिन्यात गोवा दौऱ्यावर येणार असून, हे पथक ७ आणि ८ ऑक्टोबर असे दोन दिवस गोव्यात असणार आहे. वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीष गर्ग आणि पवन कुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे पथक गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक सज्जतेचा आढावा घेणार आहे.

गोव्यात पोहोचल्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी हे पथक गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्य पोलिस अधिकारी, पोलिस अधीक्षक आणि निवडणूकसंबंधी इतर खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या विशेष बैठका घेणार आहे.

या पथकात गर्ग व शर्मा यांच्यासह आशिष गोयल, शुब्रा सक्सेना, विद्याराणी, प्रधान सचिव अजय कुमार, सचिव विनोद कुमार आणि अवर सचिव एम. एल. मीना यांचाही समावेश असेल.

Election Commission Goa visit October 2026
Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

दुसऱ्या दिवशी म्हणजे ता. ८ रोजी उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कुशावती अशा तिन्ही जिल्ह्यांतील निवडणूक अधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याद्वारे निवडणूक सज्जतेची माहिती सादर केली जाईल.

दरम्यान, गोव्याच्या संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी त्रिवेणी वेळीप यांनी तिन्ही जिल्ह्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना या दौऱ्याविषयी सर्व माहिती दिली आहे.

Election Commission Goa visit October 2026
Goa Health Checkup: राज्यातील तपासणी शिबिरांत 20 जणांना कर्करोगाचे निदान, साडेपाच हजार जणांची आरोग्य तपासणी

विरोधी पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविषयी देशभर निर्माण झालेल्या वादळामुळे गोव्यातही विरोधकांनी आवाज उठवलेला आहे. विशेष मतदारयादी अवलोकनामुळे (एसआयआर) सुमारे सव्वालाखांहून अधिक मतदार राज्यातील मतदारयादीतून वगळले गेले आहेत. त्यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे.

कुमार यांच्याविरोधात जोपर्यंत देशभर वातावरण तापलेले राहणार आहे, त्याच काळात आयोगाचे पथक गोव्यात येत आहे. त्यामुळे यावेळी विरोधी पक्षांची भूमिका काय राहणार, हेही त्यावेळी स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com