BJP MGP Alliance: फोंड्याचा निर्णय चर्चा करूनच, सद्यस्थितीत भाजप–मगो युती गरजेची- दामू नाईक

Goa BJP MGP alliance: सद्यस्थितीत भाजप–मगो युती गरजेची असून, युती तसेच फोंड्याच्या जागेबाबत भाजप, मगोचे नेते केंद्रातील वरिष्ठांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
BJP MGP Alliance
BJP MGP AllianceDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: सद्यस्थितीत भाजप–मगो युती गरजेची असून, युती तसेच फोंड्याच्या जागेबाबत भाजप, मगोचे नेते केंद्रातील वरिष्ठांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

राज्य विधानसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. गत विधानसभा निवडणुकीत भाजपने रवी नाईक यांच्या माध्यमातून फोंडा मतदारसंघ काबीज केला होता.

त्यानंतर रवी नाईक यांना मंत्रिमंडळातही संधी देण्यात आली. गतवर्षी रवी नाईक यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने फोंड्यात पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला.

BJP MGP Alliance
Goa Health Checkup: राज्यातील तपासणी शिबिरांत 20 जणांना कर्करोगाचे निदान, साडेपाच हजार जणांची आरोग्य तपासणी

परंतु, निवडून येणाऱ्या आमदाराला एक वर्षाचा कालावधी मिळत नसल्याने ही पोटनिवडणूक रद्द करण्याबाबतची याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्याने आणि न्यायालयाने याचिकेची दखल घेत निवडणूक रद्द करण्याचा आदेश दिल्याने फोंड्यातील पोटनिवडणूक रद्द झाली. त्यामुळे फोंड्याला विनाआमदार राहावे लागले आहे.

BJP MGP Alliance
Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

दरम्यान, रवींच्या निधनानंतर ‘मगो’चे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी फोंडा पोटनिवडणुकीत भाजपने रवींचे पुत्र रितेश नाईक यांनाच उमेदवारी देऊन जिंकून देण्याची सर्वप्रथम मागणी केली होती. तसाच निर्णय भाजपनेही घेतला होता.

परंतु, त्यानंतर मात्र मंत्री तथा मगोचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी मात्र येत्या निवडणुकीत फोंड्यातून स्वतः उतरण्याची तयारी सुरू केल्याने भाजपसमोरील संकट वाढले आहे. अशा स्थितीतही प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी भाजपला मगोची गरज असल्याचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात भाजपच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com