Pilgao Farmers Protest Dainik Gomantak
गोवा

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Pilgao Farmers Protest Goa Mining: वेदांताच्या मार्गात पिळगावच्या शेतकऱ्यांचा खोडा कायम; सहा दिवसांपासून खनिज वाहतूक ठप्प

गोमन्तक डिजिटल टीम

Pilgao Farmers Protest

डिचोली: पिळगावमधील शेतकरी आंदोलनातून माघार घेण्यास तयार नसल्याने वेदांता कंपनीच्या खनिज वाहतुकीत निर्माण झालेले विघ्न अद्याप दूर झालेले नाही. याप्रश्नी आता कंपनी व्यवस्थापन कोणता मार्ग काढते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच, माठवाडा भागातील पर्यायी रस्त्याने खनिज वाहतूक सुरू करण्याच्या हालचाली कंपनीने सुरू केल्याच्या माहितीमुळे माठवाड्यावरील लोकांमध्ये खळबळ माजली आहे.

पर्यायी रस्त्याने खनिज वाहतूक करण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडण्यात येईल, असा इशारा माठवाडा येथील लोकांनी दिला आहे. तसेच माठवाडा येथील एसटी समाज बांधवही आता संघटित झाले आहे.

माठवाडा येथील पर्यायी रस्त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी आज (मंगळवारी) प्रशासकीय अधिकारी माठवाडा येथे येणार असल्याची कुणकुण लागताच सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसह महिला मिळून माठवाड्यावरील लोक संघटित होऊन रस्त्यावर उतरले. मात्र, दुपारपर्यंत प्रशासकीय अधिकारी माठवाडा भागात फिरकले नाहीत.

यापूर्वीही वापरला होता रस्ता

आपल्या मागण्यांसाठी पिळगावमधील शेतकऱ्यांनी खनिज वाहतुकीचा सध्याचा मार्ग अडविला आहे. त्यामुळे बुधवारपासून वेदांता कंपनीची खनिज वाहतूक बंद आहे. कंपनी व्यवस्थापनाने प्रयत्न करूनही शेतकरी आंदोलन मागे घेण्यास तयार झालेले नाहीत.

दुसऱ्या बाजूने माठवाडा भागातून जाणाऱ्या रस्त्याने खनिज वाहतूक करण्याचा कंपनीने पर्याय विचारात घेतल्याची माहिती मिळाली आहे. काही वर्षापूर्वी या रस्त्यावरून खनिज वाहतूक करण्यात येत होती, अशी माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT