Goa Bicholim Vedanta Mining Issue
डिचोली: खाणीमुळे उदध्वस्त झालेली शेती पूर्ववत करुन द्यावी, अशी मागणी पिळगावातील शेतकऱ्यांनी केली आहे. यावरुन आक्रमक शेतकऱ्यांनी बुधवारी वेदान्ता खाणीचा रस्ता अडवला. तसेच, रस्त्यावर झोपडी देखील उभारली. पिळगावात खाण विरुद्ध शेती असा वाद पाहायला मिळाला. यावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक असफल ठरली आहे.
पिळगावातील परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयात पिळगाव शेतकरी व 'वेदांता'च्या अधिकाऱ्यांसह खाण खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. तीन तास चाललेल्या या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही अखेर बैठक बरखास्त करण्यात आली.
खाणीमुळे सुपीक शेतजमीन उद्धवस्त झाली असून, आमची शेती पूर्ववत करुन द्यावी, अशी मागणी पिळगावातील शेतकऱ्यांनी केलीय. पिळगावातील शेतकऱ्यांनी यावरुन आंदोलन उभारले आहे. यावरुन गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले आहेत. आंदोलन उभारलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी 'वेदांता'च्या अधिकाऱ्यांसह खाण खात्याचे अधिकाऱ्यांनी डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती.
तीन तास चाललेल्या या बैठकी शेतकऱ्यांच्या मागणीवर कोणताच तोडगा निघाला नाही. अखेर असफल चर्चेनंतर मागणीवर ठाम असलेल्या शेतकरी बैठकीतून बाहेर पडले. 'आमची शेतजमीन सुपीक करून आमच्या ताब्यात मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. रस्ता बंद आंदोलन चालूच राहणार, असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.