Goa Mining: पिळगाव शेतकऱ्यांचे आंदोलन, दिवस सहावा; खनिज वाहतूक व्यवसायाला मोठा फटका, 173 ट्रक खाताहेत धूळ

Pilgao Farmers Protest:: पिळगावमधील शेतकऱ्यांच्या सध्याच्या आंदोलनाचा ट्रकमालकांना फटका बसला असून सुरळीतपणे खनिज वाहतूक कधी एकदाची सुरू होते. त्याची ट्रकमालकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.
Mining Transport
Mining trucksDainik Gomantak
Published on
Updated on

Pilgao Farmers Protest Vedanta Truck Mining Dispute

डिचोली: खाणबंदी काळापासून म्हणजे गेल्या १२ वर्षांपासून आर्थिक संकटात अडकलेले डिचोलीतील ट्रकमालक पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. पिळगावमधील शेतकऱ्यांच्या सध्याच्या आंदोलनाचा ट्रकमालकांना फटका बसला असून सुरळीतपणे खनिज वाहतूक कधी एकदाची सुरू होते. त्याची ट्रकमालकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

खाण व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी खाण कंपनी व्यवस्थापनाने खाणपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वमान्य तोडगा काढावा, अशी मागणी डिचोली ट्रकमालक संघटनेने केली आहे. सरकारनेही याप्रश्नी जातीने लक्ष घालून खाण व्यवसाय जाग्यावर घालावा, अशी मागणी ट्रकमालकांनी केली आहे.

आपल्या मागण्या पुढे करुन पिळगावमधील शेतकऱ्यांनी गेल्या बुधवारपासून माठवाडा-सारमानस जंक्शनजवळ ‘रस्ता बंद’ आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा सहावा दिवस असून अद्याप ''वेदांता''च्या खाणीवरील खनिज वाहतूक बंद आहे.

ट्रक खाताहेत धूळ

डिचोली खाण ब्लॉक अंतर्गतची ''वेदांता''ची खाण सुरू झाल्यानंतर गेल्या जुलै महिन्यापासून भर पावसाळ्यात डिचोलीत खनिज वाहतूक सुरू झाली होती. जवळपास १७३ ट्रक खनिज वाहतुकीसाठी रस्त्यावरउतरले होते.

Mining Transport
Pilgao: पिळगावात तणाव! ट्रकने दिली स्कूटरचालकाला धडक; ग्रामस्थांनी रोखली 'वेदांता'ची वाहतूक

मध्यंतरी किरकोळ अपवाद वगळता गेल्या आठवड्यापर्यंत खनिज वाहतूक सुरळीतपणे चालू होती. मात्र पिळगावमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गेल्या सहा दिवसांपासून खनिज वाहतूक बंद आहे. परिणामी खाणीवरील खनिज ट्रकांची धडधड थांबली असून, गेल्या सहा दिवसांपासून खनिज ट्रक धूळ खात आहेत. काही ट्रक तर डिचोलीतील खाणीवरच पार्क करून ठेवण्यात आले आहेत.

खाणबंदी काळापासून ट्रकमालकांची अक्षरशः परवड सुरू आहेत. ट्रकमालक अजूनही आर्थिक संकटातून बाहेर पडलेले नाही. खाणबंदीवेळी ट्रकमालकांवर ''मरणकाळ'' आला होता. ट्रकमालक अजूनही सावरलेले नाहीत. खाण व्यवसाय आणि खनिज वाहतूक सुरळीतपणे सुरू व्हावी. अशी ट्रकमालकांसह खाण अवलंबीत घटकांची इच्छा आहे. खाण व्यवसाय सुरळीतपणे सुरू होण्यासाठी सर्व अडथळे दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारनेही पुढाकार घ्यावा. सध्याच्या परिस्थितीला अनुसरून खाण कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा आणि ट्रकमालकांची बैठक घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल.

सुभाष किनळकर. सरचिटणीस, डिचोली ट्रकमालक संघटना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com