Pilerne Burger Fire
Pilerne Burger Fire Dainik Gomantak
गोवा

Pilerne Berger Fire: पिळर्णच्या 2km परिघातील नागरिकांसाठी Advisory जाहीर, मदतीसाठी यांना संपर्क साधा

Pramod Yadav

पिळर्ण येथील औद्योगिक वसाहतीत बर्जर बेकर कोटिंग प्रा. लि. या खासगी कंपनीला मंगळवारी दुपारी भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे 40 बंब रात्री उशीरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करत होते. दरम्यान, आगीमुळे हवेत सर्वत्र धुराचे प्रमाण वाढले आहे. यामुळे राज्याच्या उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामु हगे यांनी नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. पुढील चोवीस तासांसाठी पिळर्ण येथील आगीच्या ठिकाणापासून दोन किलो मीटर परिघातील नागरिकांनी या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची सूचना जिल्हाधिकारी हगे यांनी केली आहे.

काय आहेत मार्गदर्श तत्वे?

- रहिवाशी आणि व्यावसायिक इमारतीत शुद्ध खेळती हवा राहिल याची काळजी घ्या. दारे, खिडक्या उघड्या ठेवा पण फॅन, एक्झॉस्ट फॅन बंद ठेवा.

- एसीचा वापर टाळा विशेषत: बंद खोलीत एसी वापरू नका

- मास्क वापरू नका

- श्वास घेण्यास त्रास झाल्यास जवळच्या वैद्यकीय केंद्राला भेट द्या किंवा गोमेकॉ किंवा 108 सेवेला फोन करा

- दमा, श्वसनाचा त्रास असलेल्या तसेच, नवजात बालकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविले जावे

- तात्पुरत्या निवासासाठी किंवा शिफ्ट करण्यासाठी काही अडचण असल्यास साळगावचे आमदार केदार नाईक (मो. नं-9850350919), जिल्हा नियंत्रण कक्ष (फोन. नं- 0832-2225083) किंवा पोलिस नियंत्रण कक्ष (112) या नंबरवर संपर्क साधता येईल.

- कोणीही घटनास्थळी जाऊ नये

- पिळर्ण आणि साळपेला जोडणारा रस्ता पुढील सूचना येईपर्यंत वाहतूकीसाठी बंद राहणार आहे.

नागरिकांना वरील सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मामु हगे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी आरोग्य विभागाला ही केमिकल कंपनी असल्याने लोकांनी आरोग्याची काळजी घेण्याबाबत अॅडव्हायजरी जारी करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच अडीच किलोमीटर परीघातील लोकांना तात्पुरते स्थलांतर करण्याची सूचना मुख्यमंत्री सावंत यांनी दिले आहेत. दरम्यान, साळपेवाडा परिसरातील 50 घरातील 200 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Loksabha: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

Goa News: कामुर्लीत घराला आग लागल्याने लाखोंचे नुकसान; मोठी दुर्घटना टळली

SCROLL FOR NEXT