Pilerne Fire: आगीवर नियंत्रण मिळवायला रात्री साडे दहा वाजणार; 40 बंब घटनास्थळी

आमदार रेजिनाल्ड यांची माहिती; जिल्हाधिकाऱ्यांनी 200 मीटर परिघातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले
Pilerne Fire in Paint Factory
Pilerne Fire in Paint FactoryDainik Gomantak

Fire in Goa Paint Factory: पिळर्ण येथील औद्योगिक वसाहतीत बर्जर बेकर कोटिंग प्रा. लि. या खासगी कंपनीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचे 40 बंब आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, रात्री साडे दहापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवता येईल, अशी माहिती स्थानिक आमदार अ‍ॅलेक्स रेजिनाल्ड यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

आमदार रेजिनाल्ड म्हणाले की, रंग हेदेखील केमिकल असल्याने त्यामुळे काळजी घेतली जात आहे. सुरक्षिततेसाठी या संपुर्ण भागाची नाकाबंदी केली गेली आहे. कुणालाही आत येऊ दिले जात नाहीय. आजुबाजुच्यांनाही सूचना दिल्या गेल्या आहेत.

Pilerne Fire in Paint Factory
Pilerne Fire: पिळर्ण येथील बर्जर बेकर पेंट कंपनीला आग; प्रोसेसिंग युनिट जळून खाक

आगीत रंग असलेला एक ट्रकदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. तो अद्याप बाहेर काढलेला नाही. ते खूप जोखमीचे आहे. देव आमच्यासोबत आहे. आम्ही खूप सुदैवी आहोत. ही कंपनी एका कोपऱ्यात असल्यामुळे इतर कुणालाही या आगीची झळ बसलेली नाही. शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. रात्री साडे दहापर्यंत अग्निशमन दलाचे ऑपरेशन चालू शकते.

दरम्यान, उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी मामू हागे म्हणाल्या की, आग लागलेली कंपनी केमिकल कंपनी असल्याने खबरदारी म्हणून 200 मीटर परिघातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले आहे. आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे.

Pilerne Fire in Paint Factory
Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्नी उद्या मुख्यमंत्री सावंत इतर मंत्र्यांसह अमित शाह यांना भेटणार

आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास सर्व रूग्णालयांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. आरोग्यावर कोणताही विपरित परिणाम होऊ नये म्हणून लोकांनी मास्क वापरावते. कंपनीत कोणती रसायने होती, ती किती घातक आहेत, याचा अहवाल कंपनी आणि आरोग्य खात्याकडून मागवला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

ही आग लागल्याची माहिती मिळताच आमदार रेजिनाल्ड आणि पोलिस अधीक्षक वाल्सन यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पिळर्ण, पर्वरी, म्हापसा, पणजी, कुंडई, फोंडा, कुडचडे, मडगाव येथील अग्निशमन केंद्रातून पाण्याचे 40 बंब आग विझवण्याचे काम करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com