Petroleum Reserves Dainik Gomantak
गोवा

Petroleum Reserves: चिखलीतील सहा विहिरींत पेट्रोलजन्य साठा!

Petroleum Reserves: चिखली पंचायत क्षेत्रातील सुमारे सहा विहिरींच्या पाण्याला पेट्रोलचा वास येऊ लागल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे.

दैनिक गोमन्तक

Petroleum Reserves: चिखली पंचायत क्षेत्रातील सुमारे सहा विहिरींच्या पाण्याला पेट्रोलचा वास येऊ लागल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. यासंबंधीची माहिती मिळताच झुआरी इंडियन ऑईल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या विहिरींची पाहणी केली.

या विहिरींमध्ये पेट्रोलजन्य पदार्थ साठल्याचे अग्निशमन दल व मुरगाव तालुका आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. चिखली पंचायतीच्या प्रभाग २ मधील व्हडले भाट (माटवे) येथील या विहिरींत पेट्रोलजन्य साठा जमल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

माटवे येथील ज्येष्ठ नागरिक ज्योकीम सांतान फर्नांडिस यांच्या घरातील विहिरीत मोठ्या प्रमाणात पेट्रोल आढळले आहे. मुरगाव अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप बिचोलकर यांनी विहिरीतील पाणी काढून त्याची चाचणी घेतली असता या पाण्याने पेट घेतला.

ज्योकीम यांच्या विहिरीत पूर्णपणे पेट्रोल जमा झाले असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान अग्निशमन बंबासह दाखल झाले असून मुरगाव आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे अधिकारी जातीने लक्ष घालत आहेत.

आज मिळणार अहवाल :

झुआरी इंडियन ऑईल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विहिरीतील पाण्याचे नमुने गोळा केले. त्याचा अहवाल कंपनी उद्या (ता. २८) मुरगाव मामलेदार आपत्कालीन व्यवस्थापन समितीला देणार आहे.

नागरिकांकडून विहिरींचे पाणी वापरणे बंद

चिखलीतील स्थानिकांनी सांगितले की, यंदाच्या चतुर्थीच्या दिवसातही येथील विहिरीच्या पाण्याला पेट्रोलचा वास येत होता. यामुळे येथील रहिवाशांनी या विहिरींच्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करणे बंद केले आहे. ज्योकीम यांची विहीर त्याच्या घरांच्या बाजूला असून तेथे मोठ्या प्रमाणात पेट्रोलजन्य पदार्थांचा साठा आढळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT