Goa School
Goa SchoolDainik Gomantak

Goa School: विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन हायस्कूलच्या महिला शिक्षिकेला अटक

Goa School: भा.दं.सं. च्या 343 आणि बाल हक्क कायद्याच्या 8 या कलमाखाली संशयित शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंद केला होता.

Goa School: एका प्राथमिक शाळेत लहान मुलाला मारहाण करण्याच्या घटनेने खळबळ माजलेली असतानाच, साखळी येथील एका हायस्कूलमध्ये विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन केल्याच्या आरोपाखाली एका शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे.

Goa School
Goa Police: 28 पोलिस उपअधीक्षकपदांसाठी 62 जण शारीरिक चाचणीस पात्र

अडीच महिन्यांपूर्वी उजेडात आलेल्या साखळीतील एका नामांकित हायस्कूलमधील अल्पवयीन विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी अखेर संशयित शिक्षिकेस पोलिसांनी आज (सोमवारी) अटक केली. ज्युडिथ सौझा असे या संशयित महिला शिक्षिकेचे नाव असून ती बार्देश तालुक्यातील रेवोडा येथील रहिवासी आहे.

या प्रकरणाचा तपास केल्यानंतर साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मारिया रिबेरो यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज (सोमवारी) संशयित शिक्षिकेला साखळी येथून अटक केली.

याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि पोलिस निरीक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विभावरी गावस पुढील तपास करीत आहेत.

मुलीच्या आईकडून तक्रार दाखल

गेल्या सप्टेंबर महिन्याच्या 9 तारखेला साखळी येथील एका हायस्कूलमध्ये विद्यार्थिनीशी असभ्य वर्तनाचा हा प्रकार घडला होता. याप्रकरणी संबंधित विद्यार्थिनीच्या आईने संशयित शिक्षिकेविरोधात डिचोली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीला अनुसरून डिचोली पोलिसांनी गेल्या 7 ऑक्टोबर रोजी भा.दं.सं. च्या 343 आणि बाल हक्क कायद्याच्या 8 या कलमाखाली संशयित शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंद केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com