Petrol Diesel Prices In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेल दरात किरकोळ घट, जाणून घ्या आजचे दर

जागतिक स्तरावरील क्रुड ऑईलच्या दरांमध्ये होणाऱ्या बदलांवरून तेलकंपन्या दररोज पेट्रोल-डीझेल या इंधन दरांत बदल करतात.

दैनिक गोमन्तक

Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये सोमवारी बदल झाले आहेत. उत्तर गोवा आणि पणजीतील दरांमध्ये किरकोळ घट झाली आहे तर दक्षिण गोव्यातील दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

उत्तर गोवा आणि पणजीतील पेट्रोल दरात प्रतीलीटर 0.73 पैशांनी घट झाली आहे. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोलचे दर स्थिर आहेत. पणजी आणि उत्तर गोव्यातील डिझेल दरात प्रतीलीटर 0.10 पैशांनी वाढ झाली आहे. तर दक्षिण गोव्यातील डिझेल दर स्थिर आहेत.

जागतिक स्तरावरील क्रुड ऑईलच्या दरांमध्ये होणाऱ्या बदलांवरून तेलकंपन्या दररोज पेट्रोल-डीझेल या इंधन दरांत बदल करतात. त्यामुळे दररोज या इंधन दरांमध्ये चढ उतार होत असतात.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.75

Panjim ₹ 97.75

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.29

Panjim ₹ 90.29

South Goa ₹ 89.68

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Constitution Day: 'संविधान हीच आमची शक्ती'; 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याचे मोदींचे आवाहन

Road Accident: 2 चिमुकल्या विद्यार्थिनींना अखेरचा निरोप; साकोर्डा अपघातानंतर 'साकवाला कठडे असते तर...'ची चर्चा

Haryana Gang War: पोलिस चौकीपासून 50 पावलांवर रक्तरंजित थरार! जेवणाच्या टेबलावरच तीघांचा मृत्यू, एकाचा पाठलाग करुन झाडल्या गोळ्या; रोहतक हादरले

Bayangini Waste Management Project: 140 कोटींचा प्रकल्प कागदावरच; बायंगिणीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला आणखी 6 महिन्यांचा विलंब?

Netravali Dairy Farmers: 'दूधग्राम'ची ओळख धोक्यात; नेत्रावळीचा दूध व्यवसाय अखेरच्या घटका मोजतोय!

SCROLL FOR NEXT