Goa Petrol Diesel Price Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Diesel Price: शनिवारपासून इंधन महागणार, गोव्यातील पंपांवर वाहनधारकांची गर्दी

Goa Petrol Diesel Price: शनिवारी (दि. 22 जून) पासून नवी दरवाढ लागू होणार असल्याने वाहन धारकांनी नवी दरवाढ लागू होण्यापूर्वी पंपांवर गर्दी केली.

Pramod Yadav

Goa Petrol Diesel Price

गोवा राज्य सरकारने इंधनावर लावण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित करात वाढ केली असून, उद्यापासून (22 जून) पेट्रोल एक रुपयांनी तर डिझेल 36 पैशांनी महाग होणार आहे. नवी दारवाढ लागू होण्यासाठी काही तास शिल्लक असताना राज्यातील पंपांवर वाहन धारकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

गोवा सरकारच्या वतीने शुक्रवारी काढलेल्या आदेशाद्वारे पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित करात (Value Added Tax) वाढ केली. नव्या करवाढीनुसार, पेट्रोलच्या दरात एक रुपयांनी तर डिझेलच्या दरात 0.36 पैशांनी वाढ होणार आहे.

उद्या म्हणजेच शनिवारी (दि. 22 जून) पासून नवी दरवाढ लागू होणार असल्याने वाहन धारकांनी नवी दरवाढ लागू होण्यापूर्वी पंपांवर गर्दी केली.

उत्तर गोव्यात (पणजी) पेट्रोल 95.34 रुपये प्रतिलिटर आणि दक्षिण गोव्यात 95.41 रुपये प्रतिलिटर दराने विक्री होत आहे. तर डिझेल राजधानी पणजीसह उत्तर गोव्यात 87.90 आणि दक्षिण गोव्यात 87.97 रुपये दराने विक्री होत आहे.

व्हॅट वाढीवरुन विरोधकांची सरकारवर टीका

राज्य सरकारने व्हॅटमध्ये वाढ केल्याने विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. लोकसभा निवडणूक संपल्याने ये तो होना ही था, अशा शब्दात विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजप सरकारवर टीका केली. तसेच, ही दरवाढ राज्य सरकारच्या इव्हेंटसाठी असल्याचे देखील आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT