Goa Monsoon 2024: पुढील 24 तास गोव्यात मुसळधार, रविवारी 'रेड अलर्ट'चा इशारा

Goa Weather Update: दोन्ही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
Monsoon 2024
Monsoon 2024Dainik Gomantak

Weather Forecast Goa

गोव्यात आज (शुक्रवार, दि. 21 जून) पुढील चोवीस तासांसाठी हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील दोन्ही जिल्ह्यात (उत्तर आणि दक्षिण) वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे. तसेच, येत्या रविवारी (23 जून) रेड अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात पुढील चोवीस तास तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर, दोन्ही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याने 21, 22, 24 आणि 25 जून रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, 23 जून (रविवारी) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाचही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. (Goa Weather)

Monsoon 2024
Ration Card: शिधापत्रिकासंबंधित ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी सूचना जारी; उशिराने सरकारला जाग - डिकॉस्ता

गोव्यात पावासाळ्यात वर्षा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर देशी पर्यटक हजेरी लावत असतात (places to visit in monsoon in goa). पावसाळ्यात राज्यातील मनमोहक धबधबे (Goa Waterfall) पाहण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात.

पण, गेल्या दोन वर्षात धबधब्यांवर होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता राज्य सरकारने केवळ कमी धोकादायक धबधबे खुले केले असून, मध्यम व अतिधोकादायक धबधब्यांवर जाण्यासाठी मज्जाव केला आहे. (things to do in goa in monsoon)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com