Petrol-Diesel Price In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Diesel Price: गोव्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनेक राज्यांमध्ये घट दिसून येत आहे.

Pramod Yadav

Goa Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, या आठवड्यात प्रथमच ब्रेंट क्रूडची किंमत 80 डॉलरच्या वर गेली आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनेक राज्यांमध्ये घट दिसून येत आहे. मात्र, आजही तेल कंपन्यांनी दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये तेलाच्या दरात वाढ केलेली नाही. गुरुवारी सकाळी बिहारची राजधानी पाटणा येथे पेट्रोल 48 पैशांनी स्वस्त होऊन 107.47 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल 45 पैशांनी घसरून 94.25 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. त्याचप्रमाणे राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेट्रोल 16 पैशांनी घसरून 108.32 रुपये प्रति लीटर, तर डिझेल 14 पैशांनी घसरून 93.58 रुपये प्रति लिटरवर पोहोचले.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 98.08

  • Panjim ₹ 98.08

  • South Goa ₹ 97.68

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.62

  • Panjim ₹ 90.62

  • South Goa ₹ 90.23

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 WC 2026: आफ्रिकेचा 'विजयी षटकार'! वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत सेमीफायनलचं तिकीट केलं पक्क; मार्करमची तुफानी खेळी ठरली निर्णायक VIDEO

Shirgao Lairai Jatra: ''6 मार्चपर्यंत क्राउड मॅनेजमेंट प्लॅन सादर करा'', शिरगाव जत्रेबाबत हायकोर्टाचा कडक आदेश; चेंगराचेंगरी टाळण्यासाठी सरकारला अल्टिमेटम

Budh Vakri 2026: 23 दिवसांचा 'राजयोग'! बुधाची वक्री चाल पालटणार 'या' 3 राशींचं आयुष्य; 21 मार्चपर्यंत बरसणार पैशांचा पाऊस

Goa Crime: मायणा-कुडतरीत खळबळ! फूस लावून पळवून अल्पवयीन मुलीचं अपहरण, संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल; पालकांचा गंभीर आरोप

Operation Sindhur 2.0: 'ऑपरेशन सिंदूर 2.0' ने उडणार पाकड्यांचा थरकाप, भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडचा थेट इशारा; शत्रूच्या छाताडावर नाचणार 'भैरव' सैन्य! VIDEO

SCROLL FOR NEXT