Income Tax PAN Card: पॅनकार्डधारकांनो सतर्क व्हा; 'हे' काम लगेच करा, नाहीतर...

PAN-Aadhaar Link Process: विभागाकडून सांगण्यात आले आहे की, 1 एप्रिलपासून अनेक पॅनकार्ड बंद होतील, म्हणजेच 31 मार्चपर्यंत तुम्ही पॅनकार्ड आधारशी लिंक करा.
PAN Card
PAN CardDainik Gomantak
Published on
Updated on

Income Tax Department: आयकर विभागाने पॅनकार्डधारकांना पुन्हा एकदा सतर्क केले आहे. विभागाकडून सांगण्यात आले की, 1 एप्रिलपासून अनेक पॅनकार्ड बंद होतील, म्हणजेच 31 मार्चपर्यंत तुम्ही पॅनकार्ड आधारशी लिंक करा. जर तुम्ही 1 एप्रिलपासून हे पॅनकार्ड वापरत असाल तर आयकर विभाग तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड ठोठावू शकतो.

दरम्यान, सध्या पॅनकार्डला (PAN Card) आधारशी लिंक करण्यासाठी 1000 हजार रुपये द्यावे लागतील. जर तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय झाले तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास होऊ शकतो हे जाणून घ्या आणि पॅनकार्ड आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया देखील जाणून घ्या...

PAN Card
Income Tax Slab: अर्थसंकल्पापूर्वीच 'या' लोकांची चांदी! 3 लाख रुपयांपर्यंत कर माफी

1000 रुपये भरुन 10,000 रुपयांचा दंड टाळा

तुम्ही 1000 रुपये जमा करुन पॅनकार्ड आधार कार्डशी (Aadhar Card) लिंक करु शकता. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) 30 जून 2022 पासून विलंब शुल्क आकारत आहे. आयकर विभागाकडून असे सांगण्यात आले आहे की, जे लोक आयकर कायदा, 1961 नुसार सूटच्या श्रेणीत येत नाहीत. त्यांचे पॅनकार्ड 1 एप्रिलपासून निष्क्रिय होतील.

अशा प्रकारे 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे

जर तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय झाले तर तुम्ही ते म्युच्युअल फंड किंवा स्टॉक खात्यासाठी वापरु शकणार नाही. याशिवाय जर तुम्ही हे कार्ड कुठेतरी कागदपत्र म्हणून वापरत असाल तर तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. आयकर विभाग आयकर कायदा, 1961 च्या कलम 272B अंतर्गत तुमच्याकडून 10,000 रुपये वसूल करु शकतो.

PAN Card
Income Tax Refund: करदाते खूश, सरकारने दिली 'ही' मोठी बातमी; तुमचे नाव यादीत आहे की नाही

या सोप्या पद्धतीने पॅन कार्ड लिंक करा

  • तुम्ही घरबसल्या पॅनकार्ड आधारशी लिंक करु शकता.

  • आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्या.

  • येथे तुम्ही आधार क्रमांकासह पॅनकार्ड लिंक करु शकता.

  • यानंतर तुम्हाला तुमची माहिती टाकावी लागेल. जसे स्वतःचे नाव आणि जन्मतारीख.

  • जर तुमच्या आधारकार्डमध्ये जन्मतारीख 1985 लिहिली असेल, तर बॉक्सवर उजवीकडे एक खूण करा.

  • सत्यापित करण्यासाठी कॅप्चा कोड प्रविष्ट करा.

  • यानंतर तुम्हाला “Link Aadhaar” लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • अशा प्रकारे तुमचे पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक केले जाईल.

PAN Card
Income Tax भरणाऱ्यांना लागली लॉटरी, अर्थमंत्री 'या' दिवशी करणार मोठी घोषणा!

तुमचे पैसे अडकू शकतात

  • तुम्ही कोठूनही 5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने खरेदी करु शकणार नाही.

  • कोणत्याही बँकेत 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम जमा किंवा काढता येणार नाही.

  • पॅनकार्ड निष्क्रिय असल्यास, तुम्ही टॅक्स रिटर्न भरु शकणार नाही. अशा परिस्थितीत तुमचा टीडीएसही बुडू शकतो.

  • म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना अडचणी येऊ शकतात.

  • सरकारी योजनांचा लाभ मिळण्यातही अडचणी येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com